दुचाकी असो वा चारचाकी, रस्त्यावर वाहन चालवताना वाहतुकीचे नियम (Traffic rules) पाळावे लागतात. यातील काही नियम वाहन चालविण्याशी संबंधित आहेत, तर काही नियम कागदपत्रांशी संबंधित आहेत. पण ड्रेस कोडशी संबंधित नियमांची माहिती फार कमी लोकांना आहे. तुम्ही अनेकदा लोकांना शॉर्ट्स किंवा चप्पल घालून दुचाकी चालवताना पाहिले असेल, आता चप्पल आणि सँडल घालून जर बाईक चालवली तरीही दंड भरावा लागेल का? हे खरं आहे का? याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी X वर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
अफवाहों से सावधान…!#TrafficFines #MotorVehicleAct pic.twitter.com/vd2gLu72i3
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) September 25, 2019
नितीन गडकरी काय म्हणाले?
चप्पल किंवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास दंड होईल, अशी कोणतीही अट मोटर वाहन कायद्यात नाही. असा कोणताही नियम कायद्यात नाही. त्यामुळेच चप्पल अथवा स्लीपर घालून बाईक चालवल्यास चलान कापले जात नाही, म्हणजेच दंड होत नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. चप्पल घालणं, अर्ध्या बाह्यांच शर्ट, लुंगी -बनियान घालून बाईक चालवणं,गाडीचा आरसा खराब असणं अथवा गाडीत एक्स्ट्रॉ बल्ब नसणं अशा गोष्टींमुळे चालान कापला जात नाही. अफवांपासून सावध रहावे. असे पोस्टमधून संबोधित करण्यात आले आहे. (Nitin Gadkari)
चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं धोकादायक
चप्पल घालून रस्त्यावर बाईक चालवणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे बाईक चालवताना चांगले बूट अथवा सँडल घालण्याचा प्रयत्न करावा. प्पल घालून दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. तसेच गिअर चेंज करतानाही त्रास होऊ शकतो. जर तुम्ही बूट घालून गाडी तालवत असाल तर ब्रेक पॅडलवर चांगली ग्रिप (पकड) मिळते. (Nitin Gadkari)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community