प्रवासादरम्यान कापले जाणार टोलचे पैसे; प्लेट रिडर कॅमेरा लावण्याची योजना 

166

भारत सरकारकडून देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल हटवून त्याजागी स्वयंचलित नंबर प्लेट रिडर कॅमेरे लावण्याची योजना अंमलात आणण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्लेट रिडर कॅमेरे ( toll plaza road camera) वाहनाचा क्रमांक स्कॅन करतील आणि त्यानंतर संबंधित वाहन धारकाच्या खात्यातून पैसे कापले जाणार आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.

( हेही वाचा : बेस्ट हा भ्रष्टाचाराचा अड्डा; लवकरच पोलखोल करणार मनसेचा इशारा )

प्लेट रिडर कॅमेरे 

२०१९ मध्ये कार कंपनीकडूनच वाहन धारकाला नंबर प्लेट देण्यात येतील असा नियम आम्ही केला होता. या नंबर प्लेट स्कॅन करता येतात. आता महामार्गावरील टोल हटवून त्याऐवजी कॅमेरे लावण्याची योजना हाती घेण्याचा मानस आहे असे नितीन गडकरी म्हणाले. वाहन चालवताना, प्रवासादरम्यान प्लेट रिडर कॅमेऱ्याने (plate reader camera) स्कॅनिंग होऊन वाहन धारकांचे पैसे बॅंकेच्या लिंक केलेल्या अकाऊंट मधून कट केले जातील अशी माहिती त्यांनी दिली.

अधिकृत नंबर प्लेट गरजेची

टोल बूथसंदर्भातील कायदेशीर तरतुदी पूर्ण करण्यासाठी ज्या वाहनांवर अधिकृत नंबर प्लेट नाही त्यांना विशिष्ट कालावधी आधी अधिकृत नंबर प्लेटची व्यवस्था करावी लागणार आहे असेही गडकरींनी स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.