आता गाडीचा चक्काचूर झाला, तरी तुम्ही वाचणार!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी त्यांच्या निर्णयांसाठी आणि कामासाठी ओळखले जातात. त्यांच्याकडे असलेल्या रस्ते आणि वाहतूक खात्यासंदर्भात त्यांनी आजवर महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. आता त्यांनी रोड सेफ्टीला अधिक चांगले बनवण्यासाठी आणि गाडीने प्रवास करणा-या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल उचलले आहे. या निर्णयानुसार, आठ आसनी गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स असणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आता अपघातात गाडीचा चक्काचूर झाला, तरी तुम्ही मात्र सुरक्षित राहणार.

गडकरींचं ट्विट

आठ आसनी क्षमतेच्या सर्व गाड्यांमध्ये कमीतकमी 6 एअरबॅग्स उपलब्ध करून देणे, कार उत्पादक कंपनीसाठी बंधनकारक असणार आहे. याबाबतच्या जीएसआरचा मसुदा आज मी मंजूर केला आहे’, अशी माहिती नितीन गडकरी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे. या निर्णयामुळे निश्चितपणे गाडीचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात प्राणहानी टळणार आहे, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

( हेही वाचा :हॅन्ड ग्लोव्हज पुरवठादारांचीही थकबाकी )

बजेट वाढणार

गाडीमध्ये सहा एअरबॅग्स लावणे बंधनकारक झाल्याने, गाडीचे बजेटही थोडेफार वाढणार आहे. सध्या दोन एअरबॅग्स बंधनकारक होत्या. आता त्यात आणखी चार एअरबॅग्सची वाढ झाल्याने, त्यासाठी साधारण 8 ते 9 हजार रुपये अधिक खर्च अपेक्षित आहे. एका एअरबॅगसाठी साधारण 1 हजार 800 रुपये लागतात आणि स्ट्रक्चरमध्ये त्यानुसार बदल करण्यासाठी 500 रुपये खर्च येईल. त्यात डिवाइस आणि लेबर कॉस्टही लागणार आहे. त्यामुळे सगळे मिळून जवळपास 30 हजार रुपये अधिक मोजावे लागू शकतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here