पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात Nitin Gadkari यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

257
पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात Nitin Gadkari यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... 
पुण्यातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात Nitin Gadkari यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले... 

आपल्या लोकशाहीची खरी कसोटी हीच आहे की, सत्तेत असलेल्या व्यक्तीने आपल्या विरोधात असलेलं जोरदार मतही सहन करावं आणि विरोध असेल तर आत्मपरीक्षण करावं. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केले. विचारवंत, आणि लेखकांनी कोणतीही भीती न बाळगता आपले मत मांडावे, असे आवाहन गडकरी यांनी केले.  (Nitin Gadkari)

संविधानाचा दाखला देत नितीन गडकरी म्हणाले की, संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. कायदेमंडळ, कार्यपालिका, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमे या चार स्तंभांवर उभ्या असलेल्या आपल्या लोकशाहीची जननी म्हटले जाते, असेही ते म्हणाले. आपली राज्यघटना (Indian Constitution) प्रत्येकाचे हक्क आणि जबाबदाऱ्या नमूद करते. ही राज्यघटना विचारवंतांना कोणत्याही भीतीशिवाय राष्ट्रहितासाठी आपले विचार मांडण्याची मुभा देते.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे येथे ते बोलत होते

पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये (MIT World Peace University, Pune) आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. सत्ताधाऱ्यांना  आपल्या विरोधात असलेलं भक्कम मतही सहन करावं लागतं, ही लोकशाहीची सर्वात मोठी कसोटी असते, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी सल्ला दिला आहे. लेखक आणि विचारवंतांनी निर्भयपणे व्यक्त व्हायला हवं असेही ते म्हणाले. (Nitin Gadkari)

(हेही वाचा – Badminton Foreign Coach : सात्त्विक, चिराग जोडीला मिळणार नवीन परदेशी प्रशिक्षक)

सामाजिक समरसतेबद्दल बोला

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) उल्लेख करत ते म्हणाले, ‘शिवाजी महाराजांपेक्षा धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वाचे दुसरे उदाहरण असू शकत नाही. इतर धर्मीयांची प्रार्थनास्थळे त्यांनी कधीच नष्ट केली नाहीत. आपला देश ‘विश्वगुरु’ व्हायचा असेल तर सामाजिक समरसतेचा मार्ग स्वीकारला पाहिजे. गडकरी यांनी भारतातील सामाजिक विषमता ही चिंताजनक प्रवृत्ती असल्याचे सांगितले, माणसाची उंची जात, भाषा, धर्म किंवा लिंग यावर अवलंबून नसते हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. (Nitin Gadkari)

हेही पाहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.