बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभेत माफी मागितली आहे. (Nitish Kumar) ७ ऑक्टोबर रोजी नितीश कुमार यांनी बिहार विधानसभेत महिला-पुरुषांच्या शारीरिक संबंधांविषयी लज्जास्पद विधान केले होते. बिहार सरकारने जाती-आधारित सर्वेक्षण आकडेवारी विधानसभेत सादर केली आहे. या मुद्यावरून बऱ्याच काळापासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या विषयावर चर्चा चालू असतांना विधानसभेत जातीनिहाय जनगणनेवरील चर्चेदरम्यान एक वेळ अशी आली, जेव्हा सर्व नेत्यांचे चेहरे मुख्यमंत्री नितीश कुमारांकडे वळले. नितीश कुमार यांनी महिला शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रणावर असे वक्तव्य केले की, महिला सदस्य अस्वस्थ झाल्या.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, “बिहारमधील महिला पूर्वीपेक्षा अधिक साक्षर आहेत. मुलींचे शिक्षण आणि लेखन हे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवेल. जर मुलगी शिकेल, तर लग्न केव्हा होईल ?’, असे म्हणून अनेक आक्षेपार्ह विधाने केली. (Nitish Kumar)
(हेही वाचा – Glenn Maxwell Carnage : ग्लेन मॅक्सवेलचं रोमांचक द्विशतक, मोडले विश्वचषकातील खंडीभर विक्रम )
सभागृहात अस्वस्थ वातावरण
नितीश यांच्या या आक्षेपार्ह विधानावर हसले. महिला सदस्य खूप अस्वस्थ झाल्या. मुख्यमंत्री नितीश यांच्या विधानामुळे काही काळासाठी संपूर्ण सभागृहात विचित्र वातावरण निर्माण झाले. अनेक महिला आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. नितीश कुमार यांनी सभागृहाच्या प्रतिष्ठेची काळजी घेतली पाहिजे, असे महिला नेत्यांनी सांगितले. भाजप आमदार गायत्री देवी यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांनी वयाची 70 वर्षे पूर्ण केली आहेत आणि त्यांनी निरर्थक टिप्पणी केली आहे. ‘आम्ही बोलू शकत नाही’, असा शब्द त्यांनी वापरला. (Nitish Kumar)
नितीश बाबू ‘बी’ श्रेणीतील प्रौढ चित्रपटांची आवड – भाजप
बिहार भाजपने त्यांच्या अधिकृत एक्स आयडीवरून पोस्ट केले की, नितीश कुमार यांच्यासारखा असभ्य नेता भारतीय राजकारणात कोणीही पाहिला नाही. नितीश बाबू यांना ‘ब’ श्रेणीतील प्रौढ चित्रपटांची आवड निर्माण झाली आहे, असे दिसते. त्यांच्या दुहेरी अर्थ असलेल्या संवादांवर सार्वजनिक बंदी घातली पाहिजे.
नितीश यांना उपमुख्यमंत्र्यांचे समर्थन
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकसंख्या नियंत्रणाबाबतच्या वक्तव्याचे समर्थन केले आणि हे विधान लैंगिक शिक्षणाशी संबंधित असल्याचे म्हटले. ते जीवशास्त्रात शिकवले जाते, असे तेजस्वी यादव म्हणाले. (Nitish Kumar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community