Maldives Controversy : मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइझ्झू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव येणार ?; काय आहे विरोधी पक्षांची भूमिका ?

285

मालदीवच्या मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर मालदीवमध्ये सरकारविरोधी वातावरण आहे. भारतियांचा रोष पाहून आता मालदीवमध्ये राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मालदीवच्या विरोधी पक्षाचे (मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी, Maldives Democratic Party) नेते अली अझीम यांनी म्हटले आहे की, आपल्याला देशाचे परराष्ट्र धोरण मजबूत ठेवावे लागेल. (Maldives Controversy)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती)

शेजारील देशांना तुटण्यापासून वाचवायचे आहे, असे त्यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे. यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाला विचारले की, ते मुइझ्झूंना हटवण्यास का तयार आहेत. त्यांनी पुढे विचारले, ”मालदीव डेमोक्रॅटिक पक्ष मुइज्जू विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणेल का ?”

सोमवार, 7 जानेवारी रोजी, भारत-मालदीव वाद (India-Maldives Dispute) जगभर चर्चेत आल्यानंतर भारत-मोदींवर भाष्य करणाऱ्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे.

इस्रायलचा लक्षद्वीपला पाठिंबा

भारत आणि मालदीव यांच्यातील बिघडलेल्या संबंधांदरम्यान इस्रायलनेही एक महत्त्वाची घोषणा केली आहे. इस्त्रायल मंगळवार, 9 जानेवारीपासून लक्षद्वीपमध्ये सी वॉटर डिसेलिनेशन प्लांट (Sea Water Desalination Plant) सुरु करत आहे. या प्रकल्पाअंतर्गत समुद्राचे खारट पाणी पिण्यायोग्य बनवण्यासाठी इस्त्रायल काम करणार आहे. भारतातील इस्रायलच्या दूतावासाने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा – GST on Online Gaming : सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस; ऑनलाइन गेमिंगवरील २८ टक्के जीएसटीवर मागवले उत्तर)

इस्रायलकडून लक्षद्वीपची छायाचित्रे प्रसारित

इस्रायलच्या दूतावासाने सोमवारी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे, आम्ही उद्यापासून (मंगळवार, 9 जानेवारी 2024) लक्षद्वीपमध्ये समुद्र-पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर (Sea-water desalination plant) काम सुरू करत आहोत. आम्ही गेल्या वर्षी लक्षद्वीपला भेट दिली होती.

या पोस्टसोबत गेल्या वर्षी लक्षद्वीपच्या इस्रायली संघाचे काही फोटोही शेअर करण्यात आले होते. पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ज्या लोकांनी आजवर लक्षद्वीपचे (Lakshadweep) सौंदर्य पाहिले नाही, त्यांनी ही काही छायाचित्रे नक्कीच पहावीत. (Maldives Controversy)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.