28 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Home समाजकारण खुशखबर, राज्यात रविवारी कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

खुशखबर, राज्यात रविवारी कोरोनाच्या एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

130
राज्यात गेल्या २४ तासांत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची खुशखबर आरोग्य विभागाने दिली. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात दर दिवसाला ८ किंवा ७ मृत्यूंची नोंद होत होती. रविवारी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
कोरोनाबाधितांचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अंशतः वाढत आहे. आता हे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. रविवारी राज्यात नव्या रुग्णांच्या नोंदीत २ हजार ५९१ कोरोना रुग्णांची भर पडली. त्या तुलनेत २ हजार ८९४ रुग्णांना यशस्वी कोरोना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर नोंदवले जात असून, मृत्यूदराचा टक्का १.८४ टक्क्यांवर कायम आहे.
३ हजार ७५३ कोरोना रुग्णांना उपचार दिले जात आहेत
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
Accept
Decline