विनामास्क नागरिकांना ‘या’ महापालिकेत ‘नो एंट्री’

107

कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने आणि सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्याने नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेकजण मास्कचा वापर करणेही टाळत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका भवनात मास्क नसणाऱ्या नागरिकांना प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिकेच्या आवारात विनामास्क नागरिक आढळल्यास त्यांना दंडही ठोठावला जाणार आहे.

विविध भागांतून लोकं येतात

कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाली असली, तरी कोरोनावर प्रभावी औषधे अद्याप सापडलेली नाहीत. कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या सध्या घटली आहे. मात्र, कोरोनाचे सावट अद्याप कायमच आहे. त्यातच पुण्यासह राज्यात ओमायक्रॉन या आफ्रिकन व्हेरिएंटचे रुग्ण आढळून येत आहेत. महापालिका भवनामध्ये दिवसभर हजारो नागरिकांची वर्दळ असते. विविध परवाने, दाखले, मान्यता, दंड भरणा इत्यादी कामांसाठी शहराच्या विविध भागातून नागरिक येत असतात.

म्हणून केली जातेय कारवाई

पालिकेत मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांच्या पालनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, नागरिक आणि ठेकेदारही पालिका भवनात मास्कशिवाय बिनधास्त वावरताना आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता पालिकेतील विनामास्क नागरिकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मास्क नसल्यास महापालिकेत प्रवेश मिळणार नसल्याचे आदेश पालिकेतर्फे काढण्यात आले आहेत.

( हेही वाचा ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट’चे स्क्रीन शाॅट काढताय…तर सावधान!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.