मेट्रो कारशेडसाठी आता झाडांची कत्तल होणार नाही, एमएमआरसीच्या अश्विनी भिडेंची माहिती

77

राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता मुंबई मेट्रोच्या कामाला वेग आला आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड करण्याचा निर्णय घेतच राज्य सरकारने मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन(एमएमआरसी)च्या व्यवस्थापकीय संचालकपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आरेमध्ये कारशेड करण्याच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत असतानाच आता मेट्रोसाठी अतिरिक्त झाडे तोडावी लागणार नसल्याचे भिडे यांनी सांगितले आहे.

निधीची पूर्तता

मेट्रो-३च्या कारशेडचे काम हे भूमीअंतर्गत होणार असून या कामात असलेल्या अडथळ्यांमुळे आणि विलंबामुळे या कामाच्या निधीत तब्बल १० हजार २७० कोटींना वाढ झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कारशेडच्या प्रकल्पाचं काम ७५ टक्के झालं असून २३ हजार १३६ पैकी २१ हजार ८९० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यामधील २१ हजार ५२० कोटी निधी खर्च केला असून, उर्वरित कामासाठीच्या निधीच्या आवश्यकतेची पूर्तता मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करण्यात आली असल्याचंही अश्विनी भिडे यांनी स्पष्ट केलं आहे.

(हेही वाचाः फुकटच्या योजनांमुळे देशाचा आर्थिक विनाश, सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल)

अतिरिक्त झाडे तोडणार नाही

मेट्रो-३ च्या कारशेडसाठी राज्य शासनाने २०१६ मध्ये एकूण ३० हेक्टर जागा दिली आहे. त्यापैकी २५ हेक्टर जागेमध्येच काम करण्यात येणार असून ५ हेक्टर जागेमधील झाडे न तोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता अतिरिक्त झाडे तोडली जाणार नसल्याचे आश्विनी भिडे यांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.