Virar-Alibaug Corridor साठी निधीच नाही; कर्ज उभारणीसाठी नव्या आर्थिक वर्षाची प्रतीक्षा

Virar-Alibaug Corridor : भूसंपादनासाठी २२ हजार २५० कोटी रुपये हुडकोकडून कर्जरूपाने घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली

145

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCच्या माध्यमातून विरार ते अलिबागदरम्यान १२८ किलोमीटर लांबीचा महामार्ग उभारला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासासाठी विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका (Virar-Alibaug Corridor) महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी २२ हजार २५० कोटी रुपये हुडकोकडून कर्जरूपाने घेण्यास राज्य मंत्रीमंडळाने मान्यता दिली होती.

(हेही वाचा – Ind vs Eng, 2nd ODI : ३२ व्या एक दिवसीय शतकानंतर रोहित शर्मा काय म्हणाला?)

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा निधीअभावी खोळंबा झाला आहे. या प्रकल्पासाठी कर्जरोख्यांच्या माध्यमातून निधी उभारण्यास राज्य सरकारची हमी न मिळाल्याने प्रकल्पाचे भूसंपादन रखडले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार आहे.

सरकारने ओलांडली कर्ज उभारणीची मर्यादा

हुडकोमध्ये राज्य सरकारचा समभाग नसल्याने ‘हुडको’ने कर्ज देण्यास नकार दिला. त्यानंतर हा निधी कर्जरोख्यांच्या स्वरूपात उभारण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. हे कर्ज १५ वर्षांच्या कालावधीसाठी उभारण्यास राज्य सरकारने जुलैमध्ये मान्यता दिली होती. वित्तीय संस्थांकडून या कर्जरोख्यांसाठी राज्य सरकारची हमी आवश्यक असते. मात्र, या आर्थिक वर्षातील कर्ज उभारणीची मर्यादा ओलांडली गेल्याने राज्य सरकारकडून ही हमी मिळू शकली नाही. एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षातच ही हमी देता येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत प्रकल्पासाठीची आवश्यक भूसंपादन प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पासाठी ३२ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे.

किती आहे खर्च ?

५५ हजार कोटींच्या या प्रकल्पात भूसंपादनाचा खर्च २२ हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे. तर प्रत्यक्ष बांधकामाचा खर्च १९ हजार कोटी इतका असणार आहे. याशिवाय, आस्थापनांवरील खर्चाची रक्कम १४ हजार कोटी रुपये होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी आतापर्यंत केवळ ३६० हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली आहे.

कसा असेल विरार-अलिबाग कॉरिडोर ?

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका (Virar-Alibaug Corridor) ही समृद्धी महामार्गासह (Samruddhi Mahamarg) आणि कोकण द्रुतगती मार्गाला (Konkan Expressway) जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. याशिवाय मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway), जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनएच-४ बी या महामार्गांना जोडण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग आठ पदरी असून त्यासाठी २१ उड्डाणपूल, पाच टनेल, ४० मोठे आणि ३२ छोटे पूल प्रस्तावित आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.