मुसलमानांनो, कोरोना लसीचे २ डोस घ्या, तरच कराल हज यात्रा! कुणी घेतला निर्णय? वाचा…

सौदीतील आरोग्य मंत्रालय आणि तेथील भारतीय दुतावासाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय हज कमिटीने घेतला आहे. 

अवघ्या जगातील मुसलमानांना आता हज यात्रेचे वेध लागले आहेत. दोन महिने आधीच त्यासाठी नोंदणी आणि तयारी करावी लागते. मागच्या वर्षी सौदी सरकारने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द केली होती, यंदा सौदी सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यांनाच यात्रेला परवानगी दिली जाईल, असे म्हटले आहे. मात्र हज कमिटी ऑफ इंडियाने त्यापुढे जाऊन ‘जे कोरोना लसीचे दोन डोस घेतील त्यांनाच हज यात्रेला जाऊ दिले जाणार आहे’, असा निर्णय घेतल्याने मुसलमानांची आता लसीकरणासाठी धावपळ सुरु होणार आहे.

काय म्हटले आहे हज कमिटीने? 

  • हज कमिटी ऑफ इंडियाचे मुख्य विशेष कार्याधिकारी मकसूद अहमद खान यांनी गुरुवारी, १६ एप्रिल रोजी हा निर्णय जाहीर केला आहे.
  • सौदीतील आरोग्य मंत्रालय आणि जेदाह येथील भारतीय दुतावासाच्या म्हणण्यानुसार हा निर्णय हज कमिटीने घेतला आहे.
  • ज्या मुसलमानांनी २०२१च्या हज यात्रेसाठी नाव नोंदणी केली असेल, त्यांनी तातडीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही डोसचे नियोजन करून त्या घ्याव्यात.
  • ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले नसतील, त्यांना हजची परवानगी नाकारण्यात येईल.
  • दोन्ही डोस दरम्यान १ ते दीड महिन्यांचे अंतर असल्याने हजची तयारी करणाऱ्यांनी आताच पहिला डोस घेण्याचे नियोजन करावे, जेणेकरून हज यात्रेला जाण्याआधी ते दुसरा डोस घेऊ शकतील.
  • सध्या यंदाच्या हज यात्रेबाबत अद्याप सौदी सरकारकडून अधिकृतपणे माहिती आलेली नाही. त्यामुळे यंदाची यात्रा होणार का, हे सौदी सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे.
  • जर भारतीय मुसलमानांना परवानगी देण्यात आली, तर जूनच्या पंधरवड्यापासून सौदीला मुसलमान रवाना होण्यास सुरुवात होईल.
  • १७ जुलै रोजी मक्का येथे पवित्र नमाज असणार आहे.

(हेही वाचा : भारतीय मुसलमानांना सौदीत ‘नो एन्ट्री’!)

मागच्या वर्षी रद्द झालेली हज यात्रा! 

२०२० साली वर्षभर जागतिक पातळीवर कोरोनाने थैमान घातले होते. हज यात्रेच्या जुलै महिन्यात तर कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे सौदी सरकारने हज यात्राच रद्द केली होती. त्यामुळे ज्या मक्का येथे पवित्र नमाजाच्या दिवशी जगभरातील लाखो मुसलमानांची गर्दी दिसते, त्याठिकाणी सौदी सरकारने केवळ १ हजार मुसलमानांनाच परवानगी दिली होती. यंदाच्या वर्षी कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ती पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. हज यात्रेच्या तोंडावरच ही दुसरी लाट आल्यामुळे भारतात परिस्थिती बिकट बनली आहे. त्यामुळे आगामी परिस्थितीवर आता भारतीय मुसलमानांची हज यात्रा अवलंबून असणार आहे.

लसीसाठी मुसलमानांची होणार धावपळ 

दरम्यान कालपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीमध्ये डुकराच्या मांसाचा अंश असतो, म्हणून ही लस ‘हराम’ आहे किंवा या लसीमुळे नपुसंकत्व येते, असे सांगत लसीकरणाला विरोध करणाऱ्या भारतीय मुसलमानांची आता लसीकरणासाठी पळापळ होणार आहे. भारतासाठी सौदीकडून ३-४ लाख मुसलमानांना परवानगी दिली जात असते, त्यामुळे आता या संख्येने मुसलमान लसीकरणासाठी लसीकरण केंद्रावर गर्दी करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे सध्या ४५ वयापर्यंतच्याच लोकांसाठी लसीकरण सुरु आहे, मात्र त्या खालील वयाच्या या मुसलमानांना हज यात्रेला जायचे असेल तेही आता लसीकरणासाठी आग्रह धरतील, त्यासाठी लसीकरण केंद्राकडे हुज्जत घालताना दिसतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here