Pune : पुण्यात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी अनोखा प्रयोग; कसा फायदा होणार?

169
पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड येथे सध्या वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे इथे वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे आता या दोन्ही प्रकारच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाने अनोखा प्रयोग केला आहे. त्याचा किती उपयोग होणार हे पहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

‘नो हॉर्न डे’ साजरा केला जाणार

या शहरात लाखो वाहनांच्या हॉर्नमुळे गोंगाट होत असतो. त्यामुळे पुणे (Pune) आणि  पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी यावर अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. यापुढे दर आठवड्याच्या सोमवारी आता ‘नो हॉर्न डे’ साजरा केला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहनचालकाने हॉर्न वाजवू नये, यासाठी वाहतूक पोलीस शाळा, कॉलेज, आय टी इंडस्ट्री, एमआयडीसीमध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. वाहतूक कोंडी झाल्याने अनेकजण मोठ मोठ्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे अनेक नागरिकांना आणि त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होतो. या ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना कान तसेच मानसिक विकार झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. आता प्रशासनाने यावर अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.