येत्या रविवारी म्हणजे 4 सप्टेंबर रोजी मुंबईच्या कोणत्याही उपनगरीय रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक (Mega block) राहणार नाही. सेंट्रल रेल्वेने याबाबतची माहिती दिली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे, त्यामुळे मुंबईकर बाप्पाच्या दर्शनासाठी बाहेर पडत आहेत. विशेष म्हणजे रविवारी शासकीय सुट्टी असल्याने या दिवशी बरेच लोक गणपतीचे दर्शन घेण्यासाठी बाहेर पडतील. त्यामुळे रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवामुळे घेतला निर्णय
रविवारी शासकीय सुट्टी असल्याने दर रविवारी रेल्वेलाईनवरील कामे पूर्ण करण्यासाठी किंवा दुरूस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. परंतु, या रविवारी गणेशोत्सव असल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ होऊ नये यासाठी रेल्वेच्या कोणत्याही लाईनवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला आहे. रेल्वेने ट्विट करून रविवारी मुंबईत रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक नसेल याबाबतची माहिती दिली आहे.
Join Our WhatsApp Community