उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक लोक गावी जातात. अशावेळी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होत असल्यामुळे कन्फर्म तिकीट मिळणे अवघड असते. तत्काळ कोट्यामधून सुद्धा तिकीट कन्फर्म होत नाही. परिणामी लोक एजंटकडे धाव घेतात. प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून IRCTCच्या वेबसाईटवर काही टिप्स दिल्या आहेत, त्या फॉलो करून तुम्ही कन्फर्म तिकीट बुक करू शकता.
( हेही वाचा : कोकणात जाताना नो टेन्शन! उन्हाळी विशेष गाड्यांना २५ मे पर्यंत मुदतवाढ )
असे मिळवा कन्फर्म तिकीट
- IRCTC अॅप डाउनलोड केल्यावर तुम्हाला मास्टर लिस्ट फिचरचा वापर करावा लागेल, या फिचरमध्ये प्रवासाची माहिती आधीच भरून ठेवा. ज्यामुळे तिकीट बुकिंगवेळी तुम्हाला पुन्हा माहिती भरावी लागणार नाही.
- मास्टर लिस्ट फिचरमध्ये तुम्ही माहिती सेव्ह करू शकता. एसी डब्यांसाठी तत्काळ बुकिंग १० वाजल्यापासून तर स्लीपर कोचसाठी ११ वाजल्यापासून बुकिंग सुरू होते.
- तत्काळ बुकिंग सुरू होण्याच्या आधी पाच मिनिटे आधी तुम्ही लॉगइन करा. यानंतर रूट सिलेक्ट करा. मास्टर लिस्टमध्ये सेव्ह केलेली माहिती अॅड करा.
- त्यानंतर पेमेंट ऑप्शनमध्ये UPIचा पर्याय निवडून या माध्यमातून पेमेंट करा, यामुळे तुमचा बराच वेळ वाचेल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होईल.