आता RTO मध्ये जायची गरजचं नाही; ड्रायव्हिंग लायसन्ससह या ५८ सेवा पूर्णपणे डिजिटल

आता तुम्हाला वाहन परवान्यासंबंधित कामांसाठी RTO मध्ये जावे लागणार नाही. वाहतुकीशी संबंधित विविध सेवा नागरिकांना पुरवण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय विविध नागरिक -केंद्री सुधारणा हाती घेत आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने याबाबत स्थायी आदेश क्र 4353(E) अन्वये अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यामुळे आता वाहतुकीशी संबंधित ५८ सेवा पूर्णत: ऑनलाईन केल्या जाणार आहेत.

( हेही वाचा : मेळघाटातील ‘ग्रासमॅन’ ची कमाल, चित्त्यांसाठी तयार केले कुरणक्षेत्र )

५८ नागरिक केंद्रित सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन

यानुसार वाहन परवाना, कंडक्टर परवाना, वाहतूक नोंदणी परवाना, मालकी हक्काचं हस्तांतरण यासह एकूण ५८ नागरिक केंद्रित सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन घेणे शक्य होणार आहे. यामुळे आरटीओ अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. मंत्रालयाने शनिवारी या सेवांबाबत माहिती दिली. त्यानुसार कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. यामुळे लोकांचा वेळ सुद्धा वाचेल आणि आरटीओ कार्यालयांमधील गर्दी कमी होईल.

शिकाऊ परवान्यासाठी अर्ज (लर्निंग लायसन्स) , पत्ता, नाव, फोटो बदलणे, आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे, कंडक्टर लायसन्समध्ये पत्ता बदलणे या कामांसाठी सुद्धा आरटीओमध्ये जाण्याची गरज नाही.

यासर्व सेवा याआधीही ऑनलाईन होत्या परंतु कागदपडताळणी करण्यासाठी नागरिकांना कार्यालयात जावे लागत होते. यानंतर आता सरकारने यात कायमचा बदल करत आता या सेवा पूर्णपणे ऑनलाईन असतील.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here