बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र कृष्ण शास्त्री सकाळी प्रयागराज येथे दाखल झाले आहेत. त्यांनी सकाळी संगम स्नान केले, यानंतर त्यांनी खाकचौक व्यवस्था समितीचे सरचिटणीस महामंडलेश्वर संतोष दास यांची भेट घेतली. बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांनी संगम तिरा येथून हिंदू राष्ट्राचा आवाज बुलंद केला. त्यांनी संतांची सुद्धा भेट घेतली आणि प्रत्येक प्रंथ आणि परंपरेतील संतांनी एकत्र येणे गरजेचे आहे असे सांगितले.
( हेही वाचा : मंदिरांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा मार्ग म्हणजेच ‘महाराष्ट्र न्यास मंदिर परिषद!’)
भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही
संत आणि सनातनी एकत्र आले तर भारताला हिंदू राष्ट्र होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असे धीरेंद्र शास्त्री म्हणाले. हिंदू राष्ट्र झाल्यावर सनातन धर्माची महिमा वाढेल, प्रत्येक सनातनींनी संघटित होऊन राष्ट्रहितासाठी कार्य केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
गुरूवारी धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार कुंवरपट्टी गावात होणार आहे. मॉं शीतल कृपा महोत्सवात आचार्य धीरेंद्र दुपारी १२ ते ३ या वेळेत दरबार लावून भाविकांच्या समस्यांचे निराकरण करणार आहेत. धीरेंद्र शास्त्री यांनी संगमस्नानानंतर संतांची भेट घेतली तसेच महंत दामोदर दास, महंत जयराम दास, महामंडलेश्वर हिटलर बाबा, महंत शशिकांत दास आदी महात्म्यांशी त्यांनी चर्चा केली.
Join Our WhatsApp Community