राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या सभेमुळे वातावरण चांगलंच तापलेलं आहे. मशिदीवरचे भोंगे हटवा अथवा आम्ही त्यासमोर हनुमान चालिसा लावू असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या सभांमधून दिला होता. त्याचीच अंमलबजावणी बुधवारी पहाटेपासून सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसही सतर्क झाले असून त्यांनी मनसैनिकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे. याच संदर्भात पुणे पोलीस आय़ुक्तांनी आपली भूमिका मांडली आहे.
मंदिरातील आरतीवर आयुक्तांचे भाष्य
पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, शहरात सकाळपासूनच दोन ते अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे. परिस्थिती सामान्य असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मनसैनिकांवर केलेल्या कारवाईबद्दलही आय़ुक्तांनी भाष्य केले असून मंदिरातली आरती कोणी थांबवू शकणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
( हेही वाचा: संदीप देशपांडे, संतोष धुरी यांची पोलिसांच्या हातावर तुरी, ताब्यात घेण्याआधी काढला पळ )