- ऋजुता लुकतुके
भारती एअरटेल या भारतीय टेलिकॉम कंपनीने मोबाईल क्षेत्रात एक क्रांतीकारक पाऊल उचललं आहे. त्यांनी आणलेला नवीन प्रोग्राम यशस्वी झाला तर मोबाईल फोनवरील स्पॅम कॉल आणि संदेश यांना चांगलाच आळा बसू शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ही स्पॅम ओळखणारी प्रणाली आहे. तिचा वापर एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी सुरूही केला आहे. स्पॅम कॉल म्हणून यापूर्वी नोंद झालेल्या क्रमांकांवरून ग्राहकांना फोन आले असतील तर स्क्रीनवर स्पॅम असंच नाव दिसेल. त्यामुळे असे कॉल ग्राहकांना लगेच टाळता येतील. ही सेवा विनामूल्य असेल. (No Spam on Mobiles ?)
भारतात स्पॅम कॉल आणि संदेश ही खूप मोठी समस्या आहे. यात तुमचा क्रमांक डिजिटल मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांना राजरोस दिला जातोय. त्यामुळे अनावश्यक कॉलच्या समस्येबरोबरच गोपनीयतेचाही भंग होत आहे. स्पॅम कॉलचं प्रमाण सगळ्यात जास्त असलेल्या कंपन्यांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे. त्यावर आता एअरटेल ही पहिली कंपनी आहे जिने एक उपाय शोधला आहे. (No Spam on Mobiles ?)
(हेही वाचा – India Monsoon : भारतात दरवर्षीच्या तुलनेत ८ टक्के जास्त पाऊस, २०२० नंतरचा सर्वोत्तम मान्सून)
‘स्पॅम हा ग्राहकांसाठी धोका बनला आहे. आम्ही गेले १२ महिने ही समस्या कशी हाताळता येईल यावर संशोधन करत होतो. ग्राहकांना स्पॅम-मुक्त, सुरक्षित आणि विश्वासार्ह नेटवर्क पुरवण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहेत. आता एआय संचालिक सेवा लाँच करताना आम्हाला आनंद होत आहे, असं भारती एअरटेलचे व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. (No Spam on Mobiles ?)
गेल्या वर्षभरात, एअरटेलच्या डेटा वैज्ञानिकांच्या इन-हाउस टीमने हे मालकीचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. जे संप्रेषणांना “संशयित स्पॅम” म्हणून ओळखते आणि वर्गीकृत करते. कॉल फ्रिक्वेन्सी, कालावधी आणि प्रेषक वर्तन यासारख्या नमुन्यांचे विश्लेषण करणे. सोल्यूशनची प्रभावीता आधीच स्पष्ट झाली आहे, एअरटेलची ही प्रणाली एका दिवसांत साधारणपणे १०० दशलक्ष कॉलवर लक्ष ठेवू शकते. (No Spam on Mobiles ?)
(हेही वाचा – Traffic Rule : वाहतूक पोलिसांना कोणते अधिकार आहेत?)
स्पॅम कॉल्स आणि एसएमएस ओळखण्यापलीकडे, एअरटेलची एआय प्रणाली तुम्हाला फेक न्यूज आणि असामाजिक तत्वांचा प्रसार करणाऱ्या संदेशांपासूनही वाचवू शकते. कारण, असे संदेश जिथून येतात ते आयपी ब्लॅकलिस्टेट असतील तर कंपनी असे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचूच देणार नाही. तसंच पोलिसांनी काही आयपी ॲड्रेस धोकादायक म्हणून वर्गीकृत केले असतील तर असे संदेशही ही प्रणाली लगेच ओळखते आणि तुम्हाला सतर्क करते. त्यामुळे फोनबरोबच तुम्हाला सायबर चोरांपासूनही संरक्षण मिळू शकतं. एअरटेलच्या या प्रणालीत दोन फिल्टर्स आहेत. एक नेटवर्क स्तरावर आणि दुसरा आयटी सिस्टम स्तरावर आहे. प्रत्येक कॉल आणि एसएमएस या डबल लेयर एआय शील्डमधून जातो. २ मिलीसेकंदांमध्ये, ही प्रणाली दररोज १.५ अब्ज संदेश आणि २.५ अब्ज कॉल्सवर प्रक्रिया करू शकते. (No Spam on Mobiles ?)
भारत सरकारने कस्टमर केअरसाठी १६० प्रेफिक्ससह १० अंकी क्रमांक निश्चित केले आहेत. बँका, म्युच्युअल फंड, विमा कंपन्या, स्टॉक ब्रोकर्स, इतर वित्तीय संस्था, कॉर्पोरेट्स, एंटरप्रायजेस, एसएमई, व्यवहार आणि सेवा कॉल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठ्या आणि लहान व्यवसायांना देण्यात आलेल्या या १६० प्रेफिक्स सीरिजमधून येणारे कॉल हे येतच राहतील. याव्यतिरिक्त, ज्या ग्राहकांनी डू-नॉट-डिस्टर्ब (डीएनडी) चा पर्याय निवडला नाही आणि प्रमोशनल कॉल प्राप्त करण्यासाठी सबस्क्रायब केले आहेत त्यांना १४० या प्रिफिक्स असलेल्या १० अंकी क्रमांकावरून कॉल प्राप्त होत राहतील. (No Spam on Mobiles ?)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community