बेमुदत संपाला सगळ्याच परिचारिकांची साथ नाही

148

राज्यात कोरोना पुन्हा डोके वर काढत असताना सरकारी रुग्णालयांत बेमुदत संप पुकारणा-या परिचारिकांना राज्यभरातून शंभर टक्के परिचारिकांचा पाठिंबा मिळालेला नाही. जे.जे. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या कामा तसेच औरंगाबाद येथील घाटी, सांगली आणि बारामती येथील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी सहभाग नोंदवलेला नाही.

गेली ५० वर्षे राज्यातील परिचारिकांच्या हक्कासाठी झटणा-या महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशननेही या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. रुग्णसेवा वेठीस धरू नका, असे आवाहन महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनच्या अध्यक्षा कमल वायकुळे यांनी आंदोलनकर्त्या परिचारिकांना केले आहे.

(हेही वाचाः परिचारिकांच्या आंदोलनामुळे १०० हून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या)

आंदोलने आम्हीही केली, पण…

परिचारिकांच्या प्रश्नांसाठी आम्ही देखील आंदोलने केली आहेत. परंतु परिचारिकांच्या मनुष्यबळाचे सरकारी रुग्णालयात व्यवस्थापन करुन आजवर आंदोलने केली गेली. संपूर्णपणे रुग्णसेवा विस्कळीत केली गेली नाही. आंदोलने ठराविक क्रमवारीने करावी लागतात. आंदोलनकर्त्या संघटनेने सरकारला विचार करायला वेळ दिलेला नाही, हा मुद्दा वायकुळे यांनी मांडला.

महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचाही विरोध

परिचारिकांच्या कंत्राटी पद्धतीने नेमणुकीला महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनचाही विरोध आहे. त्यासाठी आम्ही जाहीर विरोध दर्शवला आहे. प्रशासकीय बदल्यांनाही आम्ही विरोध केला आहे. कित्येकदा परिचारिकांना उध्वस्त होण्याची भीती असते. परिचारिकांना एखाद्या ठिकाणी स्वतःहून बदली हवी असेल तर नाकारली जाऊ नये, या मागणीवरही आम्ही ठाम आहोत, असे वायकुळे म्हणाल्या.

(हेही वाचाः परिचारिकांच्या आंदोलनाचा रुग्णसेवेवर परिणाम)

या सरकारी रुग्णालयांत शंभर टक्के परिचारिकांची उपस्थिती

  • सध्या कामा रुग्णालायात शंभर टक्के उपस्थिती असलेल्या ४०० परिचारिकांनी संपात सहभाग घेतलेला नाही. या रुग्णालयात दर दिवसाला किमान १५ गर्भवती महिलांची प्रसूती होते. शिवाय शस्त्रक्रिया, बालरोग आणि कर्करोगावर केमोथेअरपी उपचारही कामा रुग्णालयात दिले जातात. परिणामी कामा रुग्णालयातील परिचारिकांनी आंदोलनात सहभाग घ्यायला नकार दिला आहे.
  • मराठवाड्यातील रुग्णसंख्येचा भार प्रामुख्याने औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयाकडून पेलला जातो. ६७६ कामावर असलेल्या परिचारिकांनी आंदोलनात सहभाग घेतलेला नाही.
  • बारामती येथील २४२ परिचारिका कामावर हजर आहेत. त्यांचा संपात सहभाग नाही.
  • सांगली येथील सरकारी रुग्णालय तसेच मिरज सरकारी रुग्णालयातील परिचारिकाही रुग्णसेवेला प्राधान्य देत आहेत. मिरज येथील २४२ तर सांगली सरकारी रुग्णालयातील २६७ अशा शंभर टक्के परिचारिका रुग्णसेवेत व्यस्त आहेत.

(हेही वाचाः राज्यभरात परिचारिकांच्या संपाला संमिश्र प्रतिसाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.