दरड, इमारत दुर्घटनेतील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन शाळा किंवा शेडमध्ये नको; CM Eknath Shinde यांनी काय दिले निर्देश?

792
मुंबईत डोंगरावर वसलेल्या वस्त्यांमधील दरड कोसळून किंवा इमारत दुर्घटना घडल्यास तेथील कुटुंबाचे पुनर्वसन शालेय इमारती किंवा कुठल्या समाज कल्याण केंद्राच्या हॉल मध्ये न करता त्यांचे पुनर्वसन एम.एम.आर.डी.ए किंवा म्हाडा यांच्या ताब्यातील प्रकल्प बाधितांच्या  सदनिकांमध्ये व्हावे याकरिता प्रकल्प बाधितांच्या सदनिकांची दुरूस्ती  करून त्या सदनिका सुस्थितीत करून ठेवाव्यात अशा प्रकारचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एमएमआरडीए आणि म्हाडा यांना दिले आहेत.
मुंबईतील पावसाळापूर्व तयारीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ मे २०२४ रोजी बैठक पार पडली, यावेळी मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) बोलत होते. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त  संजय मुखर्जी, राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव  सोनिया सेठी, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी  संजीव जयस्वाल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ.  अश्विनी जोशी, अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त  आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, अतिरिक्त  आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव,  मुंबईचे पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव  ब्रिजेश सिंह यांच्यासह एमएमआरसीएल, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, तटरक्षक दल, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वे, परिवहन विभाग,  एनडीआरएफ, तिन्ही सैन्य दलांचे प्रतिनिधी तसेच अन्य संबंधित यंत्रणांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि डोंगरावर वसलेल्या वस्त्यामधून दरड कोसळण्याच्या शक्यता लक्षात घेता या भागातील नागरिकांना संबंधित विभागाच्या सहायक आयुक्तांनी सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न करावेत. तसे दरडप्रवण क्षेत्रामध्ये सुरक्षित जाळींचे कवच लावले जाईल का याबाबत चर्चा झाली.
महानगरपालिकेच्या वतीने २७५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. अशा अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी तात्पुरते निवारे उभे करावे किंवा पुनर्वसन सदनिकांची उपलब्ध असलेली घरे दुरुस्त करून त्यांना वापरास द्याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यामुळे बाधित होणाऱ्या  कुटुंबाला  राहण्यासाठी महापालिका, म्हाडा, एमएआरडीए यांनी निवारा व्यवस्था करावी. म्हाडा, एमएआरडीएची जी घरे प्रकल्प बधितांसाठी पडून आहेत या घरांची डागडुजी करून तात्पुरती निवारे म्हणून व्यवस्था करून यावी. पण यापुढे शेड किंवा, शाळेत  त्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था करू नये असे निर्देश दिले. संरक्षित भिंत सुरक्षित आहेत का नाही याची तपासणी करणे आदींच्या सूचनाही दिल्या. महापालिकेने हॉटलाईन ऍप तयार केला आहे. त्यामुळे कुठे कचरा आहे, गाळ टाकला आहे, त्याची माहिती मिळेल आणि नागरीकांना   याबाबतचे  फोटो अपलोड करणे आदींची सुविधा असेल. जेणेकरून याबाबत त्वरीत कार्यवाही होईल  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, पुरेशा प्रमाणात पाऊस पडत नाही तोवर नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबईकरांना केले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.