Coastal Road : मुंबई – वरळी कोस्टल रोडवर टोल नाही; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Coastal Road : शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवर 250 रुपये टोल आकराण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाविरोधात विरोधकांनी बरीच टीका केली. यानंतर मुंबई - वरळी कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकाराचा टोल आकारणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

254
Coastal Road Project : कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे लोकार्पण अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
Coastal Road Project : कोस्टल रोडच्या प्रकल्पाचे लोकार्पण अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते

मुंबई – वरळी कोस्टल रोड (Coastal Road) दरम्यान कोणत्याही प्रकारचा टोल आकारला जाणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. रविवार 7 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली. या वेळी मुंबई – वरळी कोस्टल रोडवर कोणत्याही प्रकारचा टोल लागणार नसल्याची घोषणा केली.

(हेही वाचा – 100th Akhil Bharatiya Natya Sammelan: एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील-राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला)

शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकवर 250 रुपये टोल आकराण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयाविरोधात विरोधकांनी बरीच टीका केली. यानंतर मुंबई – वरळी कोस्टल रोडवर (Mumbai – Worli Coastal Road) कोणत्याही प्रकाराचा टोल आकारणार नसल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

वाहतूक कोंडी टळणार

कोस्टल रोड 31 जानेवारीला सुरु होईल. कोस्टल रोडवरील मरीन ड्राईव्ह (Marine Drive) ते वरळी सी-फेस (Worli Sea-face) या बोगद्याचे काम 31 जानेवारीपर्यंत काम पूर्ण होणार आहे. लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. दुसऱ्या बोगद्याचे काम मे 2024 पर्यंत पूर्ण होईल. दोन्ही बोगद्यांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. दुर्घटना घडल्यास किंवा आग लागल्यास धूर बाहेर फेकला जाईल, अशी प्रणाली करण्यात आली आहे. कोस्टल रोडमुळे वाहतूक कोंडीदेखील दूर होणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – 100th Akhil Bharatiya Natya Sammelan: एकमेकांना मान द्या, तर प्रेक्षक तुमचा मान राखतील-राज ठाकरे यांचा मराठी कलाकारांना सल्ला)

कोस्टल रोडच्या कामामुळे समुद्रात भराव टाकण्यात आले आहेत. समुद्राच्या लाटांचा प्रभाव रोखण्याकरता नैसर्गिक बेसॉल्ट खडकांची समुद्री भिंत तयार करण्यात आली आहे.

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूचे उद्घाटन 12 जानेवारीला

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू (Mumbai Trans Harbour Link) 12 जानेवारीपासून सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूवर 500 रुपयांचा टोल असणार असल्याची चर्चा होती. या सागरी सेतूवर 250 रुपयांचा टोल असणार आहे, असे घोषित करण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.