वाहतूकदारांमुळे सामाजिक स्वास्थ टिकण्यास मदत होते. समाजाच्या अनेक गरजा पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) वाहतूकदारांची विनाकारण अडवणूक करू नये, असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत प्रादेशिक परिवहन विभागाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
(हेही वाचा – Sunita Williams यांना घेण्यासाठी मस्क यांचे स्पेसक्राफ्ट स्पेस स्टेशनवर पोहोचले !)
पालकमंत्री आबिटकर (Prakash Abitkar) पुढे म्हणाले की, 15 वर्षांपुढील गाड्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार काम करू तर वाहनाच्या ओव्हरलोडींगबाबत आरटीओमार्फत जो अवास्तव दंड आकारला जातो आहे त्या दंडासंदर्भात आरटीओने फेरविचार करावा, अशी सूचना आमदार चंद्रदीप नरके यांनी यावेळी केली.
(हेही वाचा – Airstrike in Myanmar : म्यानमार लष्कराचा आपल्याच गावातील नागरिकांवर हवाई हल्ला ; ६ मुलांसह २७ जण ठार)
या आढावा बैठकीत कागल येथील खाजगी आरटीओ चेक पोस्ट बॉर्डर बंद करावी, तावडे हॉटेल जवळील 13.5 जागा राज्य शासनाने ट्रक टर्मिनल्स साठी आरक्षित केली आहे त्या जागेवर मनपाने त्वरित ट्रक टर्मिनल्स उभा करावे, ई – चालन पद्धत रद्द करावी, तसेच वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची अट स्थगित करावी किंवा त्याला मुदतवाढ द्यावी याचे गुजरात राज्याप्रमाणे नंबर प्लेटच्या विक्रीचे दर ठेवावे, महामार्ग पोलिसांना पेपर तपासणीचे दिलेले अधिकार रद्द करावे अशा मागण्या लॉरी असोसिएशनच्या वतीने या बैठकीत करण्यात आल्या. या अनुषंगाने महामार्ग पोलीस, परिवहन विभागाची मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. (Prakash Abitkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community