कुर्ला, घाटकोपर, पवईत मंगळवार, बुधवारी पाणी नाही: कपातीचा फटका ‘या’ वस्त्यांना बसेल

131
मुंबई महापालिकेच्या पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ व २ साठी १८०० मिलीमीटर व्यासाची नवीन वाहिनीच्या (इनलेट) जोडणीसाठी दोन १८०० मिलीमीटर जोडकाम मंगळवारी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजता हाती घेण्यात येणार आहे. हे काम बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत  पूर्ण होणे अपेक्षित आहे.
या कालावधीत म्हणजेच मंगळवार २९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून बुधवारी ३० नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पवई( एस वॉर्ड), कुर्ला, टिळक नगर( एल वॉर्ड) आणि घाटकोपर, विद्याविहार( एन वॉर्ड ) या विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा खंडित राहील.

कुर्लयामधील या भागात पाणी नसेल

अशोक नगर, संजय नगर, सांता नगर, साने गुरुजी नगर, हिमालय सोसायटी, मिलिंद नगर, आंबेडकर नगर, सुंदर नगर, असल्फा, यादव नगर, साकीनाका पोस्ट ऑफिस, दुर्गामाता मंदीर मार्ग, जंगलेश्वर महादेव मंदीर मार्ग, लोयलका, भानुशाली वाडी, कुलकर्णी वाडी, चर्च गल्ली, संघर्ष नगर – (सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० – ही नियमित पाणीपुरवठ्याची वेळ) – (२९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते  ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

घाटकोपरमधील या भागात पाणी नाही 

राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर १ व २, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा  नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक  कॉलनी, गंगावाडी गेट नंबर २, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर – (२४ तास – पाणीपुरवठा) – (२९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).

पवईतील या भागात नसेल पाणी

पवई गौतम नगर निम्न पातळी, जयभीम नगर, बेस्ट नगर, फिल्टरपाडा, गावदेवी, पठाणवाडी, महात्मा फुले नगर, मुरारजी नगर, आरे मार्ग, पवई – (२४ तास – पाणीपुरवठा) – ( २९.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० ते दिनांक ३०.११.२०२२ रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पाणीपुरवठा खंडित राहील).
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.