आता फक्त वाशीचा मुक्काम बाकी, मग मुंबईत जाणारच. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. मी समाजाचा शब्द मोडत नाही. आपल्या मोर्चामुळे कुणाला त्रास होता काम नये. मी समाजाशी चर्चा केल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नाही. सर्वांनी आपल्या गाड्या मुंबईकडे वळवून ठेवा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी केले आहे. लोणावळा येथे जरांगे यांनी आंदोलनाला संबोधित केले. (Maratha Reservation)
(हेही वाचा – National Gallantry and Service Awards : राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर; देशभरातील ११३२ कर्मचारी होणार सन्मानित)
आंदोलन स्थगित करण्याची विनंती
लोणावळा (Lonavala) येथे सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जरांगे मोर्चा लोणावळ्यातच थांबवणार का, अशी चर्चा चालू झाली. त्या वेळी जरांगे यांनी आंदोलकांना संबोधित केले. छत्रपती संभाजीनगरचे (chhatrapati sambhaji nagar) विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड जरांगेची भेट घेणार असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करणार आहेत. तसेच शासनाच्या वतीने मागणीवर चर्चा होणार आहे. दुपारी शासनाचे आदेश घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आजची चर्चा सकारात्मक होईल आणि मनोज जरांगेंचे समाधान होईल, असा विश्वास मधुकर राजे अर्दड यांनी व्यक्त केला आहे.
मराठा मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला
मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईत येणारा मार्ग बदलला आहे. जुन्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार आहे. सायन – पनवेल मार्गाचा वापर न करता पनवेल बाहेरील पळस्पे फाटा मार्गे जेएनपीटी रस्त्यावरून उलवेमार्गे पामबीच मार्गावर दाखल होणार आहे. मराठा मोर्चाचा मार्ग बदलला असल्याने पनवेल, कामोठे, कळंबोली , खारघर मधील वाहतूक कोंडी न होता मुंबई – पुणे हायवेवरील वाहतूक सुरळीत चालणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community