कोविड लस निर्मितीत (Nobel Prize 2023) शास्त्रज्ञांचे योगदान प्रभावशाली आहे. या महामारीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी कॅटलिन कारिको (Katalin Kariko) आणि ड्रिव वेईसमन (Drew Weissman) या शास्त्रज्ञांचे लस निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. त्यामुळे शरीरविज्ञान किंवा औषधशास्त्रासाठीच्या नोबेल पारितोषिकासाठी या दोन शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे.
मानवजातीसाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या औषधशास्त्रातील वैज्ञानिकांना हा पुरस्कार दिला जातो. एएनआयने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महामारीच्या काळात या दोन्ही शास्त्रज्ञांनी mRNAकोविड लस आपल्या रोगप्रतिकाशक्ती कसा परिणाम करते, याचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासामुळेच मोठ्या प्रमाणात कोविड लस निर्मिती शक्य झाली, अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने या दोन्ही शास्त्रज्ञांना पुरस्काराची घोषणा करताना सांगितले. नोबेल पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा असून तो दरवर्षी असामान्य काम करणाऱ्या व्यक्तिंना दिला जातो. नोबेल समितीमध्ये ५० तज्ज्ञांचा समावेश होता.
(हेही वाचा – Kokan Railway : हुश्श! कोकण रेल्वे वाहतूक झाली सुरळीत)
Join Our WhatsApp Community