रेल्वे प्रवास महागणार? भरावे लागू शकतात युजर चार्जेस

याबाबत लवकरच नोटिफिकेशन जारी केले जाईल असे आयआरएसडीसीकडून सांगण्यात येत आहे.

112

आयआरएसडीसी(Indian Railway Station Development Corpo.) आणि आरएलडीए(Rail Land Development Authority) या संस्था देशातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानाकांच्या विकासासाठी काम करत आहेत. रेल्वे स्थानकांच्या विकासासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याने आता प्रवाशांना आता प्रवासी तिकीटाबरोबर युजर चार्जेसचा भुर्दंड लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना आता रेल्वेने प्रवास करणे महाग पडू शकते.

का लागणार चार्जेस?

प्रवासी तिकीटांमध्ये युजर चार्जेस समाविष्ट करण्यासाठी आयआरएसडीसी आणि आरएलडीएने याबाबतचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला होता. त्याला मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी केंद्रीय कॅबिनेट समोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला. तेव्हा यासाठी कॅबिनेटच्या परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याबाबत लवकरच नोटिफिकेशन निघण्याची शक्यता आहे. हे नोटिफिकेशन निघाल्यानंतर तात्काळ सीएसटीएम, पुणे यांसारख्या देशातील महत्त्वाच्या स्थानकांचा विकास करण्यासाठी प्रवाशांना युजर चार्जेस भरावे लागू शकतात.

(हेही वाचाः पेट्रोल नंतर आता डिझेलचीही ‘सेंच्युरी’! जाणून घ्या पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती)

किती असू शकतात चार्जेस?

तिकीटाच्या श्रेणीनुसार या युजर चार्जेसच्या किंमती निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अंदाजे 10 ते 40 रुपयांपर्यंत प्रवाशांना हे युजर चार्जेस भरावे लागू शकतात. तसेच प्लॅटफॉर्म तिकीट काढणा-या व्यक्तींना 10 रुपयांपर्यंत व्हिजिटर फी देखील लागण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच नोटिफिकेशन जारी केले जाईल असे आयआरएसडीसीकडून सांगण्यात येत आहे.

या स्थानकांचा होणार विकास

देशभरातील महत्त्वाच्या स्थानकांचा लवकरच विकास करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सीएसटीएम, कल्याण, ठाणे, ठाकुर्ली, एलटीटी आणि पुणे यांसारख्या काही स्थानकांचा समावेश असणार आहे.

(हेही वाचाः आता गॅस सिलेंडर पुन्हा महागले! इतक्या रुपयांनी वाढले दर)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.