कुत्रा चावला किंवा सार्वजनिक ठिकाणी घाण केली, तर मालकाला भरावा लागणार ‘एवढा’ दंड! पाळीव प्राण्यांसाठी नवे नियम लागू

कुत्रे किंवा पाळीव मांजरांसाठी नोएडा प्राधिकरणाच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. नोएडा प्राधिकरणाच्या नव्या नियमांनुसार पाळीव कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावला तर त्याच्या संबंधित मालकाला १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून नोएडा प्राधिकरणाने धोरण ठरवले आहे.

( हेही वाचा : आकाशात विमानांची जोरदार धडक! अपघाताची थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद)

१ मार्च २०२३ पासून नवे नियम 

नोएडा प्राधिकरणानुसार, ३१ जानेवारी २०२३ पर्यंत पाळीव कुत्रे आणि मांजरींचे रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. रजिस्ट्रेशन न केल्यास दंड आकारला जाणार आहे. तसेच पाळीव कुत्र्यांना नसबंदी/अँटीराबी लसीकरण अनिवार्य करण्यात आली आहे. याचे उल्लंघन झाल्यास १ मार्च २०२३ पासून २ हजार दंड आकारला जाणार आहे.

कुत्रा चावल्यास मालकाची जबाबदारी 

एखाद्या पाळीव कुत्र्याने रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी घाण केली तर ते साफ करण्याची जबाबदारी त्याच्या मालकाची असणार आहे आणि पाळीव कुत्रा एखाद्या व्यक्तीला चावला किंवा कुत्रे-मांजरांमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला तर त्याच्या संबंधित मालकाला १० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याशिवाय कुत्र्याच्या मालकाला जखमी व्यक्ती/प्राण्यावर उपचार करावे लागणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here