Noise Pollution: मुंबईत हॉर्नचा सर्वाधिक आवाज ‘या’ भागातून

569

शहरातील ध्वनी प्रदूषणाची (Noise Pollution) पातळी वाढत आहे. त्यातच हॉर्नच्या कर्णकर्कश आवाजाची (Horn Sound) भर पडत असल्याने नागरिकांची श्रवणशक्ती देखील कमी होत आहे. परिणामी, वाढत्या तक्रारीनुसार मुंबई वाहतूक पोलिसांनी ‘नो हॉर्न’ मोहीम (No Horn campaign) राबविण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे या कारवाईत हॉर्नमुळे सर्वाधिक आवाज जोगेश्वरी त्या पाठोपाठ हॉर्नचा कलकलाट समतानगर आणि नागपाडा येथे असल्याचे आढळून आले आहे. विनाकारण हॉर्न वाजवून ध्वनीप्रदूषण करणाऱ्या २१ हजार १६३ वाहनचालकांना पोलिसांनी १ कोटी ६० लाख १३ हजार ५०० रुपयंचा दंड ठोठावला आहे. (Noise Pollution)

मुंबईत सध्याच्या घडीला ४८ लाखांपेक्षा जास्त वाहने रजिस्टर आहे. त्याशिवाय बाहेरुन मुंबईत कामानिमित्त अनेक वाहने येतात. शहरातील प्रत्येक रस्त्यावर, नाक्यावर, चौकात सध्या वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे. त्यातच सतत हॉर्न वाजविणाऱ्यांची संख्या जास्त आहे. शहरात ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असून, पोलिसांकडे सतत हॉर्न वाजविण्यासंदर्भातील अनेक तक्रारी येत आहेत. लहान मुले आणि वृद्धांना यामुळे जास्त त्रास होतो. मुंबई पोलिसांनी विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली; मात्र त्याचा फारसा परिणाम जाणवत नसल्याने पोलिसांनी पूर्ण शहरामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्याचे ठरविले.

(हेही वाचा – संतोष देशमुखांच्या हत्येची एसआयटी चौकशी होणार ; CM Devendra Fadnavis )

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) दोन तासांसाठी ‘हॉर्नला नाही म्हणा’ (Say no to the horn), ‘नो हॉर्न’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. आठवड्यातील एक दिवस ‘हॉर्नला नाही म्हणा’ असे आवाहन करीत मुंबईकरांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. दर बुधवारी पूर्ण दिवस वाहतूक पोलीस ठिकठिकाणी फलक, बॅनर लावून हॉर्न न वाजविण्याचे संदेश देतात. प्रमुख जंक्शनवर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून चालकांना मार्गदर्शन आणि त्यांचे समुपदेशन करण्यात येते.

(हेही वाचा – Crime : दाऊद टोळीतील दानिश चिकनाला डोंगरी येथून ड्रग्ज प्रकरणात अटक)

मुंबईतील ध्वनीप्रदूषण वाढण्यास विनाकारण हॉर्न वाजविणारे जबाबदार आहेत. या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत हॉर्नमुळे सर्वाधिक आवाज जोगेश्वरीमध्ये (Noise Pollution Jogeshwari), तर त्यापाठोपाठ हॉर्नचा कलकलाट समतानगर आणि नागपाड्यात असल्याचे आढळून आले आहे. वाहनांचे कर्णकर्कश्श हॉर्न, विनाकारण हॉर्न वाजविणे यामुळे ध्वनीप्रदूषण प्रचंड वाढते. गरज नसताना विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायदा कलम १९४ (एफ) प्रमाणे कारवाई करण्यात येते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.