प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुकर व्हावा यासाठी एसटीकडून अनेक उपक्रम सुरू करण्यात येत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटी महामंडळ नव्या वर्षात फक्त शयनयान प्रकारातील विनावातानुकूलित ५० बस ताफ्यात दाखल करणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
५० विनावातानुकूलित स्पीलर बस
मार्च २०२३ पासून या विनावातानुकूलित बस प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करण्याचे एसटी महामंडळाचे उद्दिष्ट असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलिक शयनयान बसगाड्या आपल्या ताफ्यात दाखल केल्या. या बसगाड्या सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे या गाड्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. यानंतर आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान बस प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
विनावातानुकूलित ५० शयनयान बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात मार्चपर्यंत दाखल करण्यात येणार आहेत. या बससाठी जानेवारीच्या अखेरपर्यंत निविदा प्रक्रिया खुली करण्यात येणार आहे. शयनयान बस मार्च २०२३ पासून टप्प्याटप्प्याक प्रवाशांच्या सेवेत येणार आहेत.
Join Our WhatsApp Community