Medical Students Problem : वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देह मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण, देहदान चळवळीला गती नाही

कोरोना काळात देहदान बंद

142
Medical Students Problem : वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देह मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण, देहदान चळवळीला गती नाही
Medical Students Problem : वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देह मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना अडचण, देहदान चळवळीला गती नाही

मानवी शरीरशास्त्र (अॅनाटॉमी) समजून घेण्यासाठी मृत मानवी देहांची आवश्यकता असते. हे मानवी देह महाविद्यालये घेत असतात, मात्र अलीकडे देहदान करू इच्छिणाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी मानवी देह मिळत नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.

राष्ट्रीय आयोगाच्या नियमानुसार, एका देहामागे १० विद्यार्थी अभ्यास करतात. प्रत्यक्षात मात्र दुप्पट विद्यार्थ्यांमागे एक देह असल्याचे असल्याचे चित्र आहे. खासगी महाविद्यालयांमध्ये ५०विद्यार्थी एकाच देहावरून मानवी शरीररचनेची माहिती घेतात आणि सरावही करतात, मात्र सध्या देहदानाचे प्रमाण आणि देहदान करू इच्छिणाऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे.

(हेही वाचा – FIFA Awards 2023 : फिफा वार्षिक पुरस्कार सोहळ्यात मेस्सी, एमबापे आणि हालाड यांना मानांकनं)

वैद्यकीय महाविद्यालयांना इच्छापत्र लिहून दिल्यानंतर कुटुंबियांनी कळवले की, महाविद्यालये स्वत: अॅम्ब्युलन्सने देह घेऊन जातात. त्यावर रासायनिक प्रक्रिया करून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देह जतन करून ठेवला जातो. ६ महिन्यांच्या कालावधीनंतर त्याची विल्हेवाट लावली जाते. अभ्यासाच्या या प्रक्रियेतूनच भावी डॉक्टर्स घडत असतात. विविध प्रकारचे संशोधन होत असते, मात्र देहच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यात अडचणी झाल्या आहेत. यामुळे खासगी महाविद्यालयांना मृतदेह मिळत नसल्याने मॅनीकीन (मानवी पुतळा) घेण्यात येत आहे. यासाठी लवचिक रबरासारख्या मानवी देहाला टाके घालण्यात येतात. त्यानंतर सलाईनदेखील लावले जाते.

कोरोना काळात देहदान बंद…
कोरोना काळात देहदान पूर्णत: बंद झाले होते. त्यानंतर दीड वर्षांनी मृतदेह घेण्यास सुरुवात झाली, मात्र त्याला पूर्वीसारखी गती नाही. अशी माहिती देहांगदान जीवनदान संस्थेचे उदयराज आळंदकर यांनी दिली.

प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या निर्देशानुसार, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधारणपणे १५ ते २० विद्यार्थ्यांमागे एक देह देण्यात येते. प्रथम वर्ष होईपर्यंत विद्यार्थी त्यावरच प्रॅक्टिकल करतात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सध्या १० मृतदेह आहेत. त्यामुळे प्रथम वर्षाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीच अडचण नाही. प्रत्येक महिन्याला किमान एक तरी देह येतेच. विद्यार्थ्यांची गैरसोय होत नाही.

– डॉ. एम. एम. बेग, शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख (शासकीय महाविद्यालय)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.