North East Mumbai Lok Sabha : संजय दिना पाटील यांची ताकद वाढली, पण पाच लाखांच्या मतांचा डोंगर कसा करणार सर

उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात (North East Mumbai Lok Sabha) सन २०१४मध्ये निवडून आलेल्या डॉ. किरीट सोमय्या यांचा पत्ता शिवसेनेच्या दबावाखातर भाजपाने कापला आणि त्यांच्या जागी महापालिकेचे तत्कालिन गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली.

301
North East Mumbai Lok Sabha : संजय दिना पाटील यांची ताकद वाढली, पण पाच लाखांच्या मतांचा डोंगर कसा करणार सर

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबईतून भाजपाने मुलुंडमधील आमदार मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर उबाठा शिवसेना पक्षाने माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या नावाची घोषणा केली. या मतदार संघातून २००९मध्ये संजय दिना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९मध्ये सलग दुसऱ्यांदा संजय पाटील यांचा पराभव झाला होता. परंतु आता उबाठा शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याने महाविकास आघाडीची मदत त्यांना मिळणार असल्याने संजय पाटील हे मतांच्या आकडेवारीत बलवान वाटत असले तरी भाजपा उमेदवारांनी गाठलेल्या पाच लाखांच्या मतांचा पल्ला पाटील कसे गाठतात याकडेच सर्वांचे लक्ष राहिल. (North East Mumbai Lok Sabha)

उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघात (North East Mumbai Lok Sabha) सन २०१४मध्ये निवडून आलेल्या डॉ. किरीट सोमय्या यांचा पत्ता शिवसेनेच्या दबावाखातर भाजपाने कापला आणि त्यांच्या जागी महापालिकेचे तत्कालिन गटनेते मनोज कोटक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सन २०१९च्या निवडणुकीत कोटक यांनी ५लाख १४ हजार ५९९ मते मिळवली होती, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांना २ लाख ८८ हजार ११३ मते मिळाली होती. परंतु या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. (North East Mumbai Lok Sabha)

(हेही वाचा – Rana दाम्पत्य अमरावतीचे गणित कसे सोडवणार?)

भाजपासह शिवसेनेला अधिक मेहनत करावी लागणार

परंतु ईशान्य मुंबईतून भाजपाने कोटक यांचा पत्ता कापून मिहिर कोटेचा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी उबाठा शिवसेनेने उमेदवार म्हणून संजय दिना पाटील यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली आहे. सन २००४पर्यंत हा मतदार संघ काँग्रेस पक्षाकडे होता. परंतु सन २००९ झालेल्या निवडणुकीतील विजयानंतर संजय पाटील यांच्या पदरी केवळ पराभव पडला आहे. परंतु आधी सोमय्या आणि त्यानंतर कोटक यांचा पत्ता कापून भाजपाने कोटेचा यांना उमेदवारी जाहीर केल्याने काही प्रमाणात पक्षात नाराजी असली तरी पक्षाने याच नेत्यांवर कोटेचा यांना निवडून आणण्याची जबाबदारी टाकल्याने दोन्ही नेत्यांसह भाजपासह शिवसेनेला अधिक मेहनत करावी लागणार आहे. (North East Mumbai Lok Sabha)

कोटेचा हे सेफ मतदार संघ म्हणून उभे असले तरी पाटील यांना तीन निवडणुकींचा अनुभव असून त्यात एकदा विजयी आणि दोनदा पराभव झालेला आहे. त्यातच पाटील हे शिवसेनेनेच लोकसभा मतदार संघाचे संघटक असल्याने त्यांनी आधीपासूनच बांधणीला सुरुवात केली होती. त्याचाही फायदा पाटील यांना होणार आहे. त्यामुळे मुलुंड विधानसभेचे आमदार विरुद्ध माजी खासदार पाटील अशीही लढत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून संजय दिना पाटील यांनी सन २००९मध्ये २ लाख १३ हजार ५०५ मते, त्यानंतर सन २०१४मध्ये २ लाख ०८ हजार १६३ मते आणि सन २०१९च्या निवडणुकीत २ लाख ८८ हजार ११३ मते मिळाली होती. त्यामुळे सन २०१४च्या निवडणुकीच्या तुलनेत २०१९च्या निवडणुकीत पाटील यांच्या मतांमध्ये ७ टक्क्यांनी वाढलेली पहायला मिळाली आहे. तर २००९मध्येही पाटील यांचा केवळ काठावर म्हणजे ३ हजार मतांनी विजय झाला होता आणि किरीट सोमय्यांचा पराभव झाला होता. (North East Mumbai Lok Sabha)

(हेही वाचा – Sahyadri Pratishthan : सह्याद्री प्रतिष्ठानकडून भोरगिरी किल्ल्यावर भव्य राजमुद्रेची स्थापना)

उबाठा शिवसेनेच्या गडाला भेदण्याचा प्रयत्न

मुलुंडमध्ये स्वत: मिहिर कोटेचा हे आमदार असून विक्रोळी आणि भांडुपमध्ये अनुक्रमे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर, घाटकोपर पूर्व व घाटकोपर पश्चिम मध्ये अनुक्रमे भाजपचे पराग शाह आणि राम कदम आणि मानखुर्द विधानसभा मतदार संघातून समाजवादी पक्षातून अबू आझमी हे आमदार आहेत. त्यामुळे भाजपचे तीन आणि उबाठा शिवसेनेचे दोन तसेच सपाचे एक अशाप्रकारे आमदार असून ज्या मतदार संघातून उबाठा शिवसेनेचे आमदार आहेत,त्याच मतदार संघात संजय पाटील यांचे वर्चस्व मानले जात आहे. त्यामुळे भाजपा आपल्या तीन गडामधून सर्वांधिक मते मिळवण्याचा प्रयत्न करताना उबाठा शिवसेनेच्या गडाला भेदण्याचा प्रयत्न करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (North East Mumbai Lok Sabha)

संजय पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा राखी जाधव यांच्यासह जिल्हाध्यक्षांनी विरोध दर्शवला आहे. परंतु ईशान्य मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदच संजय पाटील आणि नबाव मलिक यांच्यावर होती. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदच नसल्याने राखी जाधव यांच्यासह जिल्हाध्यक्षांच्या विरोधाची दखल संजय पाटील यांच्याकडून घेतली जात नसल्याचेही कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. (North East Mumbai Lok Sabha)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.