उत्तर मॅसेडोनिया (North Macedonia) देशातील कोकानी शहरातील पल्स नाईटक्लबमध्ये (Pulse Nightclub) दि. १६ मार्च रोजी पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत किमान ५० जणांचा मृत्यू झाला आहे.तर अनेक जण जखमी झालेत.
( हेही वाचा : 10th 12th Result Date : दहावी-बारावीच्या विद्यार्थांसाठी महत्त्वाची बातमी; ‘या’ तारखेला निकाल होणार जाहीर)
उत्तर मॅसेडोनियाच्या (North Macedonia) गृह मंत्रालयाचा हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर मॅसेडोनियाच्या (North Macedonia) राजधानी स्कोप्जेपासून (Skopje) सुमारे १०० किमी पूर्वेला असलेल्या कोकानी (Kokanee) येथील पल्स नाईटक्लबमध्ये दि. १६ मार्च रोजी पहाटे प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनच्या (Hip-hop duo DNA) लाईव्ह परफॉर्मन्स सुरु होता. यावेळी अचानक आग लागली. कार्यक्रमाला सुमारे १,५०० लोक उपस्थित होते.या भीषण दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
या घटनेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नाईट क्लबमध्ये मोठी आग लागल्याचं आणि आकाशात दाट धुराचे लोट दिसत आहेत. या घटनेतील जखमींना शहराच्या दक्षिणेस सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या कोकानी आणि स्टिप (Stip) येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. नाईटक्लबमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमादरम्यान आतिषबाजीमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community