उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघ काँग्रेस (Congress) पक्षाला सोडण्यात आल्यानंतर या पक्षाकडून अद्यापही उमेदवारांचे नाव जाहीर केले जात नाही, त्यामुळे शिवसेना उबाठा पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून पाहिल्या जाणाऱ्या तेजस्वी घोसाळकर यांच्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. परंतु तेजस्वी घोसाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाला स्थानिक काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र विरोध होत आहे. काँग्रेस पक्षाने आयात करून उमेदवार का घ्यावा, काँग्रेसकडे उमेदवार नाही का? यापेक्षा सेलिब्रेटींना उतरवले जावे, परंतु कोणत्याही परिस्थिती आयात उमेदवार करू नये अशाप्रकारची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होऊ लागली आहे. (North Mumbai)
मुंबईतील उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा पक्षाने दावेदारी सांगून त्याठिकाणी विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार विनोद घोसाळकर आणि तेजस्वी घोसाळकर यांनी प्रचाराला सुरुवात करत प्रत्येक विधानसभा मतदार संघांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन धार्मिक स्थळांना भेटी घेऊन आशिर्वाद घेण्याचा प्रयत्न केला होता. (North Mumbai)
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : तामिळनाडूत भाजपाला जयललिता यांची पोकळी भरून काढण्याची संधी)
तेजस्वी घोसाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा
परंतु हा मतदार संघ आता काँग्रेसच्या वाट्याला सोडला गेला असून या मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने कोणाला उमेदवारी दिली जाईल याबाबत अद्यापही घोषणा झालेली नाही. या मतदार संघातून काँग्रेसच्यावतीने जिल्हाध्यक्ष कालू बुदेलिया यांच्यासह माजी नगरसेविका शीतल म्हात्रे तसेच चित्रपट अभिनेता रितेश देशमुख यांच्या नावाची चर्चा जोरात सुरु आहे. त्यातच आता शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर आणि त्यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा सुरु झाली आहे. तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेस पक्षात पाठवून त्यांना उत्तर मुंबईची उमेदवारी देण्याची चर्चा आहे. पण घोसाळकर यांच्या प्रवेशाला स्थानिकांचा तीव्र विरोध असल्याचे ऐकायला मिळत आहे. (North Mumbai)
काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष असून ज्यांनी आजवर काँग्रेस (Congress) पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठीच प्रयत्न केला त्यांना आता केवळ उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश का द्यायचा असा सवाल केला जात आहे. आता त्यांना आयात करायचे, निवडून आणायचे आणि निवडून आल्यानंतर ते आपल्याच मतदार संघावर दावा ठोकून मोकळे होती. उद्या हाच उमेदवार निवडून आला किंवा नाही आला तरी पुन्हा आपल्या पक्षात जाईल, मग याच्यासाठी काँग्रेसने (Congress) मेहनत का करावी. यापेक्षा काँग्रेस पक्षाने कुणालाही उमेदवारी द्यावी आम्ही पक्षाचे काम करायला तयार आहोत, अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडल्याचे दिसून येत आहे. (North Mumbai)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community