North West Lok Sabha Constituency : भाजपामधून मोहित कंबोज यांचेही नाव पुढे, पण शिवसेनेचा दावा कायम

रविंद्र वायकरच उभे करू शकतात किर्तीकरांसमोर कडवे आव्हान

313
North West Lok Sabha Constituency : भाजपामधून मोहित कंबोज यांचेही नाव पुढे, पण शिवसेनेचा दावा कायम

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघावर भाजपाने दावा सांगितला जात असला तरी शिवसेनेनेही आपला दावा कायम ठेवला आहे. मात्र, भाजपाकडून इच्छुक उमेदवारांच्या मांदियाळीत आता मोहित कंबोज अर्थात मोहित भारतीय यांचे नाव चर्चेत आले आहे. त्यामुळे मोहित कंबोज हे आता उत्तर पश्चिम मतदार संघातून उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात असून हा मतदार संघ शिवसेनेकडेही अद्यापही असल्याने शिवसेनेचे विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी माघार घेतल्याने काही दिवसांपूर्वी पक्षात प्रवेश करणाऱ्या आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांचे नावही आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून शिवसेना उबाठा पक्षाने युवा सेनेचे अमोल किर्तीकर यांचे नाव जाहीर केले असून अमोल किर्तीकर यांच्या उमेदवारीनंतर विद्यमान खासदार गजानन किर्तीकर यांनी या मतदार संघातून उभे न राहण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. त्यातच उत्तर पश्चिम मतदार संघ व ठाणे लोकसभा मतदार संघ याबाबत भाजपा (BJP) आणि शिवसेनेत अदलाबदलीची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे ठाण्याची जागा शिवसेनेला देऊन उत्तर पश्चिम मतदार संघाची जागा भाजपाला सोडण्याची चर्चा सुरु झाल्यानंतर उत्तर पश्चिम मतदार संघातून आमदार अमित साटम, आमदार अतुल भातखळकर, जयप्रकाश ठाकूर, संजय उपाध्याय यांची नावे चर्चेत होती. परंतु आता भाजपाकडून आणखी एका नावाची चर्चा सुरु झाली असून दिंडोशी विधानसभेतून निवडणूक लढवून पराभूत झालेल्या मोहित कंबोज यांचे नाव चर्चेत आले. त्यामुळे भाजपामध्ये आता या मतदार संघातील इच्छुक उमेदवारांची संख्या वाढतच चालली आहे. (North West Lok Sabha Constituency)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: राज ठाकरेंचा ४ दिवसांत दुसऱ्यांदा दिल्ली दौरा, महायुतीत सहभागी होणार का? चर्चांना उधाण)

दरम्यान, उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून भाजपाच्या इच्छुक उमेदवारांची नावे पुढे येत असली तरी हा मतदार संघ शिवसेनेचाच असल्याचे शिवसेनेकडून सांगितले जात आहे. ठाणे आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या अदलाबदलीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे या मतदार संघावर शिवसेनेचाच अधिकार असून गजानन किर्तीकर हे जर निवडणूक लढवणार नसतील तर आमदार रविंद्र वायकर (Ravindra Waikar) हे या मतदार संघात अमोल किर्तीकर यांच्यासमोर आव्हान निर्माण करू शकतात, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे रविंद्र वायकर हे या मतदार संघातून प्रबळ दावेदार ठरू शकतात आणि वायकर यांचे या मतदार संघात चांगल्याप्रकारे वजन असल्याने याचा फायदा शिवसेनेला होऊ शकतो, असेही स्थानिकांचे म्हणणे आहे. राजकीय जाणकारांच्या म्हणण्यानुसार जागांची अदलाबदल हे माध्यमातून बोलले जात आहे, पण दोन्ही पक्षाने कुठेही याबाबत वाच्यता केलेली नाही. त्यामुळे या मतदार संघावर शिवसेनेचा दावा राहणार असून जर वायकरांना संधी दिल्यास ही जागा शंभर टक्के शिवसेनेच्या बाजुने झुकली जाईल. विशेष म्हणजे शिवसेनेचे चिन्ह हे धनुष्यबाण असून अमोल किर्तीकर हे मशाल चिन्हावर लढणार असल्याने धनुष्यबाण आणि वायकर यांचे विभागातील काम यामुळे शिवसेनेला निश्चितच वायकरांच्या उमेदवारीचा फायदा होईल, असे बोलले जात आहे. (North West Lok Sabha Constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.