आमदार बालमुकुंद आचार्य (Balamukund Acharya) हे राजस्थान विधानसभा निवडणुकीत पूर्ण बहुमताने निवडून आले आहेत. जयपूरमधील हवामहल मतदारसंघातून निवडून आल्यानंतर त्यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामध्ये त्यांनी ‘एकाही रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोराला (Bangladeshi infiltrator) राजस्थानमध्ये (Rajasthan) राहू देणार नाही’, असे म्हटले आहे. आचार्य बालमुकुंद यांनी काँग्रेसचे आर्.आर्. तिवारी यांचा पराभव करून विजय मिळवला आहे.
(हेही वाचा – Mosque : मशिदीवरील भोंग्याचा आवाज वाढल्यामुळे मौलवीविरोधात गुन्हा दाखल )
मांसाहाराची दुकाने बंद करण्याचा आदेश
आमदार बालमुकुंद आचार्य यांनी दुसरा एक व्हिडिओ प्रसारित केला असून त्यामध्ये अवैध मांसाहाराची (Illegal Meat Shops) दुकाने बंद करण्याचा आदेश दिला आहे. आमदाराच्या मागणीची कार्यवाही करण्यासाठी पोलिसांनी २ दिवसांचा कालावधी मागितला आहे. (BJP)
आचार्य बालमुकुंद (Balamukund Acharya) यांचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला असून त्यात त्यांनी, ‘माझ्या परिसरात बेकायदेशीर मांसाहाराची दुकाने चालू देणार नाही’, अशी घोषणा केली आहे.
(हेही वाचा – Water Pipeline : जलवाहिनीला हानी पोहोचवणाऱ्या ‘त्या’ कंत्राटदाराला सुमारे सव्वा कोटींचा दंड)
उघड्यावर मांसविक्रीला पाठिंबा नाही
भाजप आमदार आचार्य बालमुकुंद (Balamukund Acharya) यांचा पहिला व्हायरल व्हिडिओ 30 सेकंदांचा आहे. या व्हिडिओमध्ये ते अनेक लोकांनी वेढलेले दिसत आहेत. त्या वेळी त्यांचा फोन स्पीकरवर होता. तेव्हा दुसऱ्या बाजूने संबंधित अधिकाऱ्याचा आवाज येत आहे. रस्त्यावर उघड्यावर मांसाहारी ((Illegal Meat Shops)) पदार्थ विकले जाऊ शकतात का, असा सवाल आमदाराने अधिकाऱ्याला केला. “अजिबात नाही”, अधिकाऱ्याने उत्तर दिले. पुढच्या प्रश्नात आमदारांनी अधिकाऱ्याला ‘उघड्यावर मांसविक्रीला पाठिंबा आहे का’, असे विचारले असता अधिकारी पुन्हा ‘नाही’ म्हणाला. (Balamukund Acharya)
हेही पहा –