केंद्र सकारने 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणा-या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदीविरोधात केलेल्या 58 याचिका फेटाळून लावत हा निर्णय दिला आहे. मोदी सरकारने घेतलेला नोटबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. 2016 साली केंद्र सरकारने 1 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. या निर्णयानंतर एका रात्रीत 10 लाख कोटी चलनातून बाद करण्यात आले होते.
( हेही वाचा: जम्मू- कश्मीरमध्ये हिंदू कुटुंबांवर दहशतवादी हल्ला; 4 जणांचा मृत्यू, तर 9 जखमी )
एकूण 58 याचिका न्यायालयाने फेटाळल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षाने कडाडून विरोध केला होता. इतकेच नाही तर नोटबंदी ही अयोग्य असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाविरुद्ध एकूण 58 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. या सर्व याचिका फेटाळून लावत, सर्वोच्च न्यायालयाने नोटबंदी योग्यच असल्याचे सांगितले आहे.