वस्तू व सेवा कराचा नवा नियम लागू झाला असून, त्यानुसार आता घरभाड्यावर 18 टक्के GST लागणार आहे. हा कर reverse charge व्यवस्थेंतर्गत लागणार आहे. म्हणजेच भाडेकरुला जीएसटी भरावा लागेल. जाणकरांच्या मते, स्थावर मालमत्ता भाड्याने देणे यास जीएसटी अधिनियमानुसार, सेवा मानण्यात आली आहे. त्यामुळे त्यावर सेवा कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी काही प्रमुख मुद्दे जाणून घेऊया.
कोणावर किती परिणाम ?
रिअल इस्टेट तज्ज्ञ आशुतोष श्रीवास्तव यांनी सांगितले की, जीएसटी कायद्यात करण्यात आलेल्या सुधारणेचा मुख्य उद्देश निवासी जागा भाड्याने देणा-या संस्थांकडून कर वसूल करणे हा होता. तथापि, कायद्याचा मसुदा पाहता, घर भाड्याने घेणा-या लोकांवरही या कराचा भार पडेल, हे स्पष्ट दिसते.
कोण येणार कराच्या कक्षेत?
जीएसटी नोंदणी असलेल्या लोकांवरच या कराचा भार पडणार आहे. सगळ्याच नोकरदार अथवा व्यावसायिक भाडेकरुंकडून हा कर वसूल केला जाणार नाही. कर तज्ज्ञ अचित गुप्ता यांनी सांगितले की, तुम्ही भाड्याच्या घरात काम करत असाल, पण घरभाडे आपल्या व्यावसायिक खर्चात दाखवून आयटीआरमध्ये कर सवलत घेत नसाल, तर तुम्हाला हा कर भरावा लागणार नाही.
घरमालक नोंदणीकृत नसेल तर?
घर मालकाची जीएसटी नोंदणी नसेल, मात्र भाडेकरुची असेल, तर भाडेकरुकडून 18 टक्के दराने जीएसटी वसूल केला जाईल, आतापर्यंत केवळ व्यावसायिक वापरासाठीच घरभाड्यावर जीएसटी लागत होता. आता मात्र भाड्याच्या घराचा वापर व्यावसायिक असो अथवा निवासी जीएसटी लागणारच आहे.
( हेही वाचा: दादर-माहिम,धारावी आणि वडाळ्याच्या शिवसेना विभागप्रमुखपदी महेश सावंत; पक्षातील निष्ठावान शिवसैनिकांवर मात्र पक्षाचा अविश्वास )
कंपनीसाठी नवीन नियम
एखाद्या कंपनीने आपल्या कर्मचा-यांसाठी घर भाड्याने घेतले असेल, तर कंपनीला जीएसटी भरावा लागेल. कारण यातील भाडेकरु कंपनी आहे.
कसा भरणार जीएसटी
भाडेकरुस जीएसटी रिटर्न भरावे लागेल, तसेच जो कर बसेल तो भरावा लागेल. त्यावर त्यास इनपूट क्रेडिटची सवलतही मिळेल.
Join Our WhatsApp Community