आता सर्वांनाच 10 एप्रिलपासून बूस्टर डोस!

84

सध्या देशात कोरोना संसर्ग आटोक्यात असल्याने सरकारने अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र इतर देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आता भारत सरकारने सावध पावले उचलली आहेत. 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वच नागरिकांना बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत देशातील 194 कोटी नागरिकांचे लसीकरण झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.

खासगी केंद्रांवरही उपलब्ध

एखाद्याला बूस्टर डोस घ्यायचा असेल, तर खासगी हॉस्पिटलमध्येही ही सुविधा उपलब्ध होणार आहे. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, ज्यांचे वय 18 वर्षांहून अधिक आहे आणि दोन्ही डोस घेतले असून, दुसऱ्या डोसला ९ महिन्यांहून अधिक कालावधी झाला आहे, ते करोनाचा प्रतिबंधात्मक डोस घेऊ शकतात. खासगी केंद्रांवरही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

( हेही वाचा मोठी बातमी! एसटी आंदोलकांना आझाद मैदानातून बाहेर काढले, सीएसएमटी स्थानकात कर्मचा-यांचा आक्रोश )

आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचा बूस्टर डोस सुरु राहणार

आता दिले जाणारे बूस्टर डोस हे आरोग्य सेवा कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत सुरु राहणार आहेत. त्याला गती दिली जाणार असल्याचे, आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. या आधी केवळ आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस दिला जात होता.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.