रेशनकार्ड हे महत्तवाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. विशेष म्हणजे Below Poverty Line खाली येणाऱ्या लोकांसाठी रेशनकार्ड अधिक महत्त्वाचे आहे. कारण रेशनकार्डचा उपयोग करून या लोकांना कमी किंमतीत अन्नधान्य खरेदी करता येते. याशिवाय रेशनकार्ड आधारकार्डाप्रमाणे महत्वाचे ओळखपत्र व पुरावा आहे. विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड अपडेट असणे महत्वाचे असते. रेशनकार्डामध्ये घरातील सर्व सदस्यांच्या नावाचा समावेश केला जातो. परंतु आता तुम्हाला कोणत्याही नव्या सदस्याच्या नावाचा रेशनकार्डात समावेश करायचा असल्यास घरबसल्या तुमचे रेशनकार्ड अपडेट करता येईल जाणून घ्या ही प्रक्रिया…
( हेही वाचा : आधार कार्डवर मराठीत अपडेट करा तुमची माहिती! जाणून घ्या प्रक्रिया )
नव्या सदस्याचे नाव समाविष्ट करण्यासाठी प्रक्रिया
- रेशनकार्ड बनवण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. महाराष्ट्रातील नागरिक mahafood.gov.in या वेबसाइटला भेट देऊ शकतात.
- आता लॉगइन आयडी क्रिएट करा अथवा आधीपासूनच आयडी असल्यास लॉनइन करा.
- आता तुम्हाला होमपेजवर नवीन सदस्याला समावेश करण्याचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- येथे क्लिक करून फॉर्म भरा.
- नव्या सदस्याची माहिती भरा.
- महत्वाच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करा.
- सबमिट केल्यानंतर फॉर्मला ट्रॅक करण्यासाठी तुम्हाला Registration क्रमांक मिळेल.
- व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रेशनकार्ड घरपोच मिळेल.
लहान मुलांचे नाव जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- कुटुंबातील सदस्यांचे नाव असलेल्या मूळ रेशनकार्डची फोटोकॉपी.
- बाळाचा जन्मदाखला.
- बाळाच्या पालकांचे आधार कार्ड.
( हेही वाचा : स्मार्ट फोनवरून काही मिनिटात करा आधार कार्ड अपडेट)
नवविवाहित व्यक्तीचे नाव जोडण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- लग्नाचे प्रमाणपत्र ( Marriage certificate).
- नव्या सदस्यांच्या पालकांचे रेशन कार्ड.