दूरदर्शनवर दिसणार आता ‘AI Anchor’

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या युगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी बनणार आहे.

217
दूरदर्शनवर दिसणार आता ‘AI Anchor’

कृत्रिम बुद्धीमत्ता वापरणारी पहिली सरकारी वाहिनी (Government channel) डीडी किसान (DD Kisan) म्हणजेच दूरदर्शन किसान वाहिनीवर आता कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापरातून 2 वृत्त निवेदक (2 news reporter) बातमीपत्र देतील. येत्या 26 मे पासून वाहिनी एकमद नवीन स्वरूपात आणि नवीन शैलीत सादरीकरण करणार आहे. हे सर्व दूरदर्शनच्या कामगिरीतील एक महत्वाचा टप्पा ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (artificial intelligence) या युगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली सरकारी दूरदर्शन वाहिनी बनणार आहे, जी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे सादरीकरण करणार आहे. (AI Anchor)

डीडी किसान वाहिनी दोन एआय अँकर (एआय क्रिश आणि एआय भूमी) (AI Krrish and AI Bhumi) यांना घेऊन सादरीकरण करणार आहे. हे वृत्त निवेदक प्रत्यक्षात जे कॉम्प्युटर आहेत, ते हुबेहुब माणसासारखे दिसणार असून माणसासारखे काम करू शकतात. हे एआय न थांबता किंवा न थकता 24 तास आणि 365 दिवस बातम्या वाचू शकतात. काश्मीरपासून तामिळनाडूपर्यंत आणि गुजरातपासून अरुणाचलपर्यंत देशातील सर्व राज्यांमधील शेतकरी दर्शकांना हे निवेदक पाहता येणार आहेत, हे एआय-निवेदक देशात आणि जागतिक स्तरावर होत असलेली कृषी संशोधन विषयक माहिती, शेतकरी बाजारांचा कल, हवामानातील बदल किंवा सरकारी योजनांची माहिती अशी सर्व माहिती पुरवतील. या निवेदकांची एक खास गोष्ट म्हणजे ते देश-विदेशातील पन्नास भाषांमध्ये बोलू शकतील. (AI Anchor)

(हेही वाचा – Powai Lake : पवई तलावातील जलपर्णी काढण्यासाठी हार्वेस्टरचा वापर की पोकलेनचा? )

डीडी किसान ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली देशातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे. या वाहिनीची स्थापना 26 मे 2015 रोजी झाली. डीडी किसान वाहिनीच्या स्थापनेचा उद्देश शेतकऱ्यांना हवामानातील बदल, जागतिक आणि स्थानिक बाजारपेठा इत्यादींबद्दल नित्य माहिती देणे हा आहे, जेणेकरून शेतकरी अगोदरच आपल्या कामाचे योग्य नियोजन करू शकतील आणि वेळेवर योग्य निर्णय घेऊ शकतील.संतुलित शेती, पशुसंवर्धन आणि वृक्षारोपण यांचा समावेश असलेल्या शेतीच्या त्रिस्तरीय संकल्पनेला डीडी किसान वाहिनी बळकट करत आहे. (AI Anchor) 

हेही पाहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.