ज्वारी, बाजरी, नाचणी आणि भादली तृण, भरड धान्यापासून विना मैद्याचे, भेसळयुक्त बेकरी प्राॅडक्ट तयार करण्यावर डाॅक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात संशोधन सुरु आहे. याकरता शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाकडून भरीव निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. पोषक घटक असणेही तेवढेच गरजेचे असल्याने ज्वारी, बाजरी, नाचणी आणि भादली या धान्यापासून चार प्रकारची उत्पादने तयार करण्यासाठीचा प्रकल्प अकोल्याच्या कृषी विद्यापीठात सुरु करण्यात आला आहे.
यामध्ये बिस्कीट, टोस्ट, कफकेक, लांब ब्रेडस्टीकचा समावेश आहे. या सर्व उत्पादनांवर संशोधन सुरु आहे. संशोधनातून हे तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर या तंत्रज्ञानाचा विस्तार केला जाणार आहे.
( हेही वाचा: अहो सामनाचे संपादक; सावरकरांचा नव्हे तर शिवसेनेचा खुळखुळा झाला आहे )
मैदा न मिसळता मिळणार प्राॅडक्ट
विशेष संशोधन करण्यात येत असल्याने मैदा न मिसळता, अत्यंत स्वच्छ ठिकाणी ही उत्पादने तयार केली जाणार आहेत. परंतु ज्वारी, बाजरी, नाचणी आणि भादलीपासून तयार होणारे हे प्राॅडक्ट उत्तम आहेत.
Join Our WhatsApp Community