आता क्षयरोगाच्या निकटवर्तीयांचा शोध घेतला जाणार

मुंबईत क्षयरोगाला आळा घालण्यासाठी केवळ क्षयरोगाच्या रुग्णांच्या उपचारावरच लक्ष केंद्रीत न करता क्षयरुग्णांच्या संपर्कात येणा-या निकटवर्तीयांचा शोध घेण्याचा निर्णय पालिका आरोग्य खात्याने घेतला आहे. याच अंतर्गत आता क्षयरुग्णांच्या निकटच्या संपर्कातील व्यक्तींची आय.जी.आर.ए. ही चाचणी मोफत केली जाणार आहे. या चाचणीत एखाद्या सुदृढ व्यक्तीला क्षयरोगाचे लक्षण नसेल तरीही संक्रमण झाले आहे का त्याचे निदान करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची ठरते.

सुप्त क्षयरोगाचा नायनाट करण्याचा मूळ उद्देश

सुदृढ परंतु लक्षणविरहीत रुग्णांमध्ये आढळून येणा-या क्षयरोगाला सुप्त क्षयरोग असे संबोधले जाते. सुप्त क्षयरोगाचे वेळेवर निदान झाल्यास, रुग्णाला वेळेवर उपचार देता येतात. परिणामी, शरीरात पूर्णपणे क्षयरोगाचा विळखा तयार होत नाही.

आय.जी.आर.ए. चाचणी

सामान्यपणे क्षयरोगविषयक वैद्यकीय चाचण्यांमध्ये सुप्त क्षयरोगाचे निदान होत नाही. त्यामुळे सुप्त क्षयरोगाच्या संसर्गाचे निदान करण्यासाठी आय.जी.आर.ए. चाचणी करावी लागते. या अंतर्गत संबंधित व्यक्तीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. चाचणीनंतर २४ तासांत अहवाल मिळणे अपेक्षित आहे.

( हेही वाचा: ‘नमामि चंद्रभागा’ला प्रशासनाचा खोडा, लाखो रूपयांची उधळपट्टी )

उपचारपद्धती –

निकटवर्तीयांची तपासणी चाचणी अहवाल नकारात्मक असला तरीही पुढील दोन वर्षे क्षयरोगाबाबतची पाठपुरावा तपासणी सुरु राहील. सहा महिन्यांतून एकदा तपासणी केली जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here