राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी कायद्याचे शिक्षण घेत असतात. बहुतांशी विद्यार्थी हे ग्रामीण भागातूनही येतात. त्यामुळे ते मराठीतून शिक्षण घेण्याला प्राधान्य देतात. मात्र कायद्याचे शिक्षण मराठीतून उपलब्ध नाही. त्यामुळे मराठी विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या सीनेट अधीसभेत हा विषय कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्याकडे काढण्यात आला. यावर कुलगुरुंनी कायद्याचे शिक्षण मराठीतून होण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे.
मराठीतून अभ्यास करण्यावर भर
मुंबई विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या अधिसभेमध्ये युवासेना सिनेट सदस्य ऍड. वैभव थोरात यांनी विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये येणा-या अडचणी कुलगुरूंसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी मुंबई शहरातील काही महाविद्यालये सोडली, तर विद्यापीठाच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील बहुतांश विद्यार्थी हे विधीचा अभ्यास हा मराठीमधून करण्यावर भर देतात.
( हेही वाचा: कोळी बांधवांच्या विरोधामुळे धारावीतील पंपिंग स्टेशनची जागा बदलली )
परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर
मात्र या विद्यार्थ्यांसाठी बाजारामध्ये दोन ते तीन प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध असल्याने, त्यांना नोट्स काढणे व अभ्यास करणे अवघड जाते. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजीच्या नोट्सचे मराठीमध्ये भाषांतर करावे लागते. अनेक विद्यार्थी हे जळगाव, परभणी, नांदेड, पश्चिम महाराष्ट्रात जाऊन तिकडून नोट्स आणतात. मात्र त्या नोट्ससुद्धा तुटपुंज्या असतात. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होत असतो.