देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत असतानाच आता केंद्र सरकारने लसीकरणाच्या बाबतीत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरात आता 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस हा मोफत देण्याचे सरकारने जाहीर केले आहे. त्यामुळे 15 जुलैपासून 75 दिवस आता 18 वर्षांवरील पात्र नागरिकांना बूस्टर डोस मोफत घेता येणार आहे.
#WATCH | Union Minister Anurag Thakur says, "…It has been decided that from 15th July 2022 till the next 75 days, all citizens above 18 years of age will be given booster doses free of cost…This facility will be available at all government centres…"#COVID19 pic.twitter.com/kZSOqHZQLg
— ANI (@ANI) July 13, 2022
केंद्र सरकारचा निर्णय
केंद्र सरकारच्या बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्याचं 75वे म्हणजेच अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरं करत आहोत, त्यामुळे 15 जुलैपासून पुढचे 75 दिवस 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोनाचा बूस्टर डोस मोफतमध्ये देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. याआधी केवळ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांनाच बूस्टर डोस मोफत दिला जात होता. पण आता 18 वर्षांवरील सर्वांनाच हा डोस मोफत मिळणार आहे. त्यामुळे बूस्टर डोससाठी पात्र असलेले सर्व नागरिक हा डोस मोफतमध्ये घेऊ शकणार आहेत.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवर हा बूस्टर डोस मोफत देण्यात येईल, असे ठाकूर यांनी सांगितले आहे.
Join Our WhatsApp Community