DCM Ajit Pawar : आता मुलांच्या नावामागे आधी आईचे मग वडिलांचे नाव लागणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

362
Ajit Pawar यांना मोठा धक्का; श्रीमंत रामराजे स्वगृही परतणार?
सध्या महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध प्रकारे प्रयत्न करत असते, त्याचाच एक भाग म्हणून आता मुलांच्या नावामागे आधी आईचे मग वडिलांचे नाव लागणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी केली.

चौथे महिला धोरण आणले

उपरोक्त घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी बारामतीमध्ये केली आहे. मुलांमुलीच्या नावामध्ये आधी आईचे नाव लावणार नंतर वडिलांचे नाव असेल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आपण महिलांना संधी दिली. आपण चौथे महिला धोरण आणले. महिला मंत्री असल्याने तिलाही त्यातील माहिती होती. तुम्हाला लवकरच काही माहिती मिळेल. आधी अजित अनंतराव पवार असे नाव दिले जायचे. आता इथून पुढे आधी मुलाचे किंवा मुलीचे नाव, नंतर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि मग आडनाव असे संपूर्ण नाव असणार आहेत, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.