आता सोने घेताना ई – वे बिल बंधनकारक?

155

करचोरीला आळा घालण्यासाठी सोने आणि मौल्यवान खड्यांच्या खरेदी- विक्री व्यवहारांना वस्तू व सेवा कराअंतर्गत ई-वे बिल बंधनकारक करण्याचा विचार सरकार करत असून, यासंबंधीचा प्रस्ताव जीएसटी परिषदेच्या टेबलावर असल्याचे समजते.

वस्तूची एका राज्यातून दुस-या राज्यात वाहतूक करताना, ई-वे बिल यंत्रणा लावली जाते. वस्तूचा संपूर्ण प्रवास त्यामुळे नोंद होतो. या यंत्रणेचा काटेकोर वापर केल्यास करचोरी करणे शक्य होत नाही. ई-बिलासाठी 2 लाख रुपयांची किमान मर्यादा असल्याचे समोर आले आहे.

मासिक भरणा फाॅर्ममध्ये होणार बदल

मासिक कर भरणा फाॅर्म जीएसटीआर- 3 बी मध्ये बदल करण्याच्या प्रस्तावावरही जीएसटी परिषदेत विचार केला जाणार आहे. या फाॅर्ममध्ये विक्री विवरणपत्राशी संबंधित पुरवठा आकडे आणि कर भरणा तालिका समाविष्ट करण्यात येणार आहे. यात बदल केला जाऊ शकणार नाही, त्यामुळे बनावट बिलांना आळा घालण्यास मदत मिळेल.

( हेही वाचा संजय राऊत म्हणतात; 10 बंडखोर आमदार पवारांसमोर बोलले )

दूध, तूप, लोणी महागच राहणार

पॅनलने देशी तूप, लोणी आणि सुगंधी दुधावरील दरात कमी करण्याची मागणी फेटाळून लावली आहे. या प्रकारच्या अन्य उत्पादनांवर 12 टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे दूध, तूप, लोणी यावरील दर कमी करता येणार नसल्याचे सांगण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.