आता ATM मधून १०० रुपयांच्या नोटा सहज मिळणार; सरकारने दिले ‘हे’ आदेश

120

बहुतेक ATM मध्ये ५०० रुप्यांच्याच नोटा मिळतात, त्यामुळे अनेकांची गैरसोय होते, अनेकांना ५०० रुपयांपेक्षा कमी रक्कम काढायची असेल तरी ते नाईलाजास्तव ५०० रुपये काढावे लागतात, ही समस्या लक्षात घेऊन आता सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये ATM मधून १०० आणि २०० रुपयांच्या नोटा सहज उपलब्ध होतील, असा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारने नुकतेच यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. बनावट नोटा रोखण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यासाठी सरकारने एटीएममध्ये छोट्या नोटांचा समावेश करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. आता एटीएममधून 100, 200 च्या नोटा सहज मिळू शकतात. त्याचबरोबर बनावट नोटांविरोधात सरकार अनेक पातळ्यांवर कारवाई करत आहे. देशात नोटाबंदीनंतर आतापर्यंत केवळ ८४ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पीएमएलए अंतर्गत आठ प्रकरणे हाती घेण्यात आली आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लेखी उत्तरात म्हटले आहे की, हे थांबवण्यासाठी एनआयएकडून बनावट भारतीय नोटांवर बंदी घालण्यासाठीची चौकशी सुरू आहे. दहशतवादी संघटनेला पैसे देण्याचे प्रकरणही समोर आले असून त्यात अनेक एजन्सी गुंतल्या आहेत.यासाठी एफआयसीएन या नोडल एजन्सीच्या तस्कराची माहिती आणि विश्लेषण करण्यासाठी देशाच्या शेजारी देशासोबत एक संयुक्त टीम तयार करण्यात आली असून, ती कार्यरत आहे.

(हेही वाचा छत्रपती संभाजीनगर राड्यात राष्ट्रवादीचा हात असल्याचा आरोप; त्यावर अजित पवार म्हणाले…)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.