आता PMPML बसने प्रवास करण्यासाठी पोलिसांनाही काढावे लागणार तिकीट

पुण्याची लाईफलाइन PMPML ने प्रवास करण्यासाठी पोलिसांनाही बसचे तिकीट काढावे लागणार आहे. पुणे पोलिसांना पुणे परिवहन बसचे तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. पुण्यात पुन्हा एकदा महापालिका विरुद्ध पोलीस आयुक्त असा संघर्ष पेटल्याचे दिसत आहे. तिकीट काढण्यावरुन हा वाद पेटला आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचा-यांना आता पुणे महापालिकेच्या PMPML बसमध्ये मोफत प्रवास करता येणार नाही. पुणे आणि पिंपरी या 2 शहरांतील पोलिसांची PMPML बसेसमधून विनातिकीट प्रवास सुविधा 15 नोव्हेंबरपासून बंद करण्यात आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांनी हे आदेश काढले आहेत.

( हेही वाचा: शनिवार वाड्याच्या पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी )

पुणे पोलीस आयुक्तालयाचा विरोध 

राज्य सरकारने 1991 मध्ये पोलीस कर्मचा-यांना बसमधून विनातिकीट प्रवासाची परवानगी दिली होती. 31 वर्षांनंतर पुणे, पिंपरी- चिंचवडमध्ये ही सेवा आता बंद करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाने या निर्णयाला विरोध दर्शवल्याची माहिती समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here