इंधन तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्याने, आधीच सर्वसामान्य माणसांचे हाल झाले आहेत. त्यात आता पाण्याचे दर वाढवण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पिण्याच्या, शेतीसाठीच्या आणि औद्योगिक वापरासाठीच्या पाणीपट्टीचे नवे दर प्रस्तावित केले आहेत.
पाणीपट्टीचा आर्थिक भार
येत्या तीन वर्षांसाठी पाण्याचे दर वाढवण्यात आले आहेत. त्यानुसार 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात प्रति व्यक्ती 150 लिटर, तर 50 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या महापालिका क्षेत्रात प्रति व्यक्ती 135 लिटर पाणी मिळणार आहे. या नव्या आरक्षणापेक्षा अधिक पाणी वापर लक्षात घ्यावा लागणार आहे. त्यातच प्रति हजार लिटरला घरगुतीसाठी 30 ते 60 पैसे वाढ नव्याने प्रस्तावित केल्याने, पाणीपट्टीचा आर्थिक भार नव्याने सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे, तर औद्योगिकसाठी 4 रुपये 50 पैसे वाढ नव्याने प्रस्तावित केल्याने पाणीपट्टीचा आर्थिक भार नव्याने सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे दर निश्चित
महापालिकांनी घरगुती पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट पाणी उचलल्यास 25 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास 50 पैसे, तर औद्योगिक वापरासाठी थेट धरणातून पाणी उचलणा-या प्रक्रिया उद्योगांना 4.80 रुपये आणि कच्चा माल उद्योगांना 120 रुपये, तसेच कालव्यातून पाणी उचलणा-या प्रक्रिया उद्योगांना 9.60 रुपये, तर कच्चा माल उद्योगांना 240 रुपये असे दर सन 2018 मध्ये निश्चित करण्यात आले होते.
( हेही वाचा: …अन् मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेनंच घातला बहिष्कार! )
पिण्याच्या पाण्याचे दर
नव्याने प्रस्तावित केलेल्या दरानुसार महापालिकांना पिण्याच्या पाण्यासाठी धरणातून थेट पाणी उचलल्यास 55 पैसे आणि कालव्यातून उचलल्यास 1.10 पैसे तर औद्योगिक वापरात पाणी उचलणा-या प्रक्रिया उद्योगांना 9.30 रुपये आणि कच्चा माल उद्योगांना 232.50 रुपये, तसेच कालव्यातून पाणी उचलणा-या प्रक्रिया उद्योगांना 18.60 रुपये, तर कच्चा माल उद्योगांना 465 रुपये असे दर प्रस्तावित करण्यात आले आहेत.