शाळेत जाणा-या विद्यार्थ्यांच्या पाठीवर त्यांच्या वजनाहून अधिक दप्तराचे ओझे असते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हाच भार कमी करण्यासाठी आता पाठ्यपुस्तक मंडळाने एकात्मक पुस्तकाचा प्रयोग हाती घेतला आहे. यानुसार पहिली आणि दुसरीत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आता शाळेत दप्तराचे ओझे न्यावे लागणार नाही. या विद्यार्थ्यांना सर्व विषय एकाच पुस्तकात दिले जाणार आहेत.
तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझेही होणार कमी
बालभारतीने अशा प्रकारचे पाठ्यपुस्तक तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्यांत प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग राबवण्यात आला आहे. तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी असाच प्रयोग राबवला जाण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: राज्यात पुन्हा मास्क सक्ती? केंद्राचे राज्याला पत्र )
सध्या पुस्तके पाठवण्याचे काम सुरु
आता एकाच पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित, हिंदी आदी विषय असणार आहेत. विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण घेता येण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा प्रयोग फक्त मराठी शाळांसाठीच असणार आहे. ‘यू डायस’ मधून विद्यार्थ्यांची नोंद झालेल्या ठिकाणीच ही पुस्तके पोहोचणार आहेत. सध्या पुस्तके पाठवण्याचे काम सुरु आहे.
Join Our WhatsApp Community